शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघात चुरस

पोलीसनामा (शरद पुजारी) – शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात निवडणूक चुरशीची होणार आहे. राज्यातील हायहोल्टेज लढतीपैकी एक लढत शिरूरमध्ये होणार असल्याचे मत राजकीय विश्‍लेषकांनी व्यक्‍त केले आहे.

सन २००९च्या मतदार संघ विभाजनात पुरंदर  विधानसभा मतदार संघातील पूर्वी हवेलीतील गावे शिरुर मतदार संघाला जोडून शिरुर हवेली मतदार संघ तयार झाला त्यावेळी  झालेल्या पंचरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अशोक पवार अंदाजे साडेपाच हजार मताने निवडून येऊन राष्ट्रवादीचा झेंडा फडकला तर बाबूराव पाचार्णे यांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली.

त्यावेळी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या बाबूराव पाचार्णे याना नाटयमय घाडमोडी घडत राष्ट्रवादीने ऐनवेळी तिकीट नाकरले व नवखे अशोक पवार यांना उमेदवारी दिली तर भाजपाने राष्ट्रवादीतून आलेल्या व शिरुरच्या राजकारणात मुरब्बी असणाऱ्या मंगलदास बांदल यांना उमेदवारी दिली. तर बाबूराव पाचार्णे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करत निवडणूक लढवली तसेच पुणेजिल्हा मध्यवर्ती बँकेचे जेष्ठ संचालक निवृत्ती आण्णा गवारी यांनी “अभी नही तो कभी नही” नारा देत अपक्ष उमेदवारी अर्ज  दाखल केला. त्याचवेळी  हवेलीचा स्वाभिमान म्हणत यशवंत कारखान्याचे चेअरमन प्रा. के डी कांचन यांनी कामगारांना बरोबर घेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार यांनी बाजी मारली.

त्यानंतर या मतदार संघात अशोक पवार यांनी अनेक विकास कामे करण्याबरोबरच विधान सभेच्या सभागृहात अनेक प्रश्न उपस्थित केले व मतदार संघात केलेल्या विकास कांमाच्या जोरावर सर्वसामन्य लोकांच्या मनात स्थान निर्माण केले.त्यानंतर सन २०१४ साली आघाडीत बिघाडी झाली तर युती तुटली तर सर्वच राजकीय पक्षानी स्वभळाचा नारा देत निवडणूकाना समोरे गेले आणि शिरुर हवेली पुन्हा  चौरंगी लढत झाली यात भाजपाच्या बाबूराव पाचार्णे यांनी अशोक पवार यांना धोबीपछाड देत विजय मिळविला तात्कालीन आघाडी सरकारच्या काळात या मतदार संघातील यंशवत सहकारी साखार कारखान्याच्या संचालक मंडळावर भष्टाचाराचे आरोप झाला.

कारखान्याची बिकट अवस्था झाली कारखाना बंद पडला त्यामुळे सन २०१२ आघाडी सरकारने प्रशासक नेमला त्यानंतर कारखाना चालू करण्याचा प्रयत्न प्रशासका मार्फत सुरु होईल असे वाटत होते पंरतु त्यात अनेक अडचणी आल्या २०१४च्या निवडणूकीत बंद पडलेला यशवंत सहकरी साखर कारखाना  हाच प्रचाराचा मुद्दा करुन बाबूराव पाचार्णे यांनी शिरुर हवेलीत प्रचार सभांमध्ये आवाज उठवून राळ उडवून दिली. त्यावेळी उरुळी कांचन येथे झालेल्या विराट सभेत भाजपच्या नेत्यांनी गर्जना केली जर सरकार आमचे आले तर मंञीमंडळाच्या कॕबिनेटच्या पहिल्याच बैठकीत यंशवंत कारखान्याचा निर्णय घेऊन शंभर दिवसात कारखाना चालू करु असे आश्वासन दिले आणि हवेलीच्या जनतेने त्याच्या घोषणेवर विश्वास ठेवला आणि बाबूराव पाचार्णे यांना भरघोस मताने निवडून दिले सरकार आले आश्वासनाला पाच वर्षे पूर्ण झाली पण यशवंत  चालू झाला नाही फक्त प्रशासकाची बदली झाली प्रशासकीय संचालक मंडळ नेमले, ते बरखास्त करुन पुन्हा अवासायनात काढून अवसायक नेमले शेवटी हा कारखाना राज्य सहकारी बँकेच्या ताब्यात गेला याच्या पलीकडे काहीच झाले नाही त्यामुळे या निवडणूकीत यंशवंतचा मुद्दा गाजणार एवढे माञ नक्की या मतदार सघात राष्ट्रवादीकडून माजी आमदार अशोक पवार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदिप कंद भाजपकडून विघमान आमदार बाबूराव पाचार्णे,शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके हे प्रमुख दावेदार असून युती आणि आघाडी झाल्यावरच या मतदार संघाचे एकंदरीत चिञ स्पष्ट होणार असून या मतदार संघात २१ हजार सभासद शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर प्रभाव टाकणार्‍या प्रश्नाचा तसेच शेकडो  कामगारांचा जिव्हाळ्याचा असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना नक्की कधी चालू  होणार तसेच सभासदाचे थकीत उस बील कामगारांचा पगार फंडचे पैसे कधी मिळणार या आशेवर शेतकरी तसेच कामगार बसले असून कारखाना बंद पडल्यापासून शेतकऱ्यांना अनेक कुंटुबिक अडचणीचा सामना करावा लागत असून मुंलाची शिक्षण, लग्न,रोजी रोटीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

त्यामुळे यशवंतच्या  मुद्द्यावर हवेलीचे राजकारण फिरणार हे माञ नक्की असून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य याञा तसेच भाजपाची महाजनादेश याञा मतदार संघातुन गेल्याने विधानसभा निवडणुकीचे बिगूल आधीच वाजले असून ही निवडणूक चुरशीची होणार हे माञ नक्की आहे. 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like