RJ : राज्यपालांची भेट घेऊन CM गेहलोत यांनी केला बहुमताचा दावा, सादर केली तब्बल ‘एवढ्या’आमदारांची यादी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत शनिवारी सायंकाळी जयपूरमधील राजभवनात पोहोचले. त्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि बहुमत असल्याचा दावा केला. त्यांना 102 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अशोक गहलोत यांनी केला. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांना पाठिंबा देणार्‍या 102 आमदारांची यादी दिली. भारतीय ट्राइबल पार्टी (बीटीपी) चे दोन आमदार अशोक गेहलोत यांना पाठिंबा देण्यासाठी आज हॉटेलमध्ये दाखल झाले होते.

विधानसभा समीकरणानुसार विधानसभा अध्यक्षांसह कॉंग्रेसचे 100 आमदार अशोक गहलोत गटाजवळ आहेत. भारतीय ट्राइबल पार्टीच्या दोन आमदारांनी पाठिंबा दिल्यानंतर अशोक गेहलोत यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या 102 झाली. 200 सदस्यीय विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी 101 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे.

तर भारतीय जनता पक्षाकडे (भाजपा) 72 आमदार आहेत. राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे तीन आमदार आहेत. म्हणजेच भाजपा आघाडीत एकूण 75 आमदार आहेत. तर सचिन पायलट यांना कॉंग्रेसच्या 19 आमदारांचा पाठिंबा आहे. तीन अपक्ष आमदार आहेत आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आहेत. अशा प्रकारे पायलट गटामध्ये एकूण 23 आमदार आहेत.