‘महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’ बॅनरवर भडकले ‘नेटकरी’ ; म्हणाले, महाराष्ट्राचा राजा एकच ‘छत्रपती शिवाजी महाराज’

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपने महाजनादेश यात्रा सुरु केली होती. मात्र कोल्हापूर आणि सांगलीच्या भागात आलेल्या महापुरामुळे सर्वच राजकीय पक्षांना आपल्या यात्रा थांबवाव्या लागल्या होत्या. मात्र आता पूरजन्य परिस्थिती निवळल्यावर पुन्हा सर्व राजकीय दलांनी आपल्या यात्रा सुरु केल्या आहेत. याच अनुषंगाने सत्ताधारी भाजपनेही आपली रखडलेली महाजानदेश यात्रा सुरु केली आहे.

महाजानदेश यात्रेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणारे फलक अहमदनगर-औरंगाबाद रस्त्यावर लावण्यात आले आहेत. यामध्ये ‘देवांचा राजा इंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र’ असा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यावरून नेटकाऱ्यांनी सत्ताधारी भाजपला चांगलेच धारेवर धरले आहे.

नेटकऱ्यांनी लिहिलं आहे की, महाराष्ट्राचे राजे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तर काहींनी भाजपला आपल्या कार्यकर्त्यांना आवार घालण्याचा सल्ला दिला आहे. तसेच येथे कचरा टाकू नये असं लिहिलेलं असतानाही फलक लावलाय अशा प्रकारे अनेकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
अहमदनगर – औरंगाबाद हायवे वरून प्रवास करणाऱ्यांना या फलकामुळे आश्चर्याचा धक्का बसत आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त-

You might also like