CM Eknath Shinde | शिवसेनेचे आणखी 3-4 आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काल विधानसभेच्या दोन दिवसीय विशेष अधिवेशनाच्या (Legislative Assembly Special Session) शेवटच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सभागृहातील आपल्या भाषणात सत्तांतर नाट्य आणि बंडखोरी का केली, याविषयी सविस्तर सांगितले. शिवसेनेचे आणखी 3-4 आमदार (Shivsena MLA) संपर्कात असून ते आमच्या गटात सामील होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात केवळ 15 आमदार उरले आहेत. त्यातील आणखी 3-4 आमदार आमच्यासोबत येतील. संतोष बांगर (Santosh Bangar) काल रात्री माझ्याकडे आले. आणखी तीन-चार जण यायला तयार आहेत, असे त्यांनी मला सांगितले. मी कोणालाही जबरदस्तीने, बंदूक लावून आणले नाही, असा खुलासाही शिंदे यांनी केला.

 

शिंदे म्हणाले, सत्तांतराच्या नाट्यातील सर्वात मोठे कलाकार हे देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) होते. ते काही काय घडविणार आहेत, कधी काय करतील याचा नेम नाही. ते पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री झालो आहे यावर अजूनही माझाच विश्वास बसत नाही. सत्तापक्षात असलेले 50 आमदार बाहेर पडून विरोधी पक्षासोबत गेले. नऊ मंत्र्यांनी त्यांची मंत्रिपदे डावावर लावली, हे सगळे पहिल्यांदाच घडले.

शिंदे म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीनंतर (Vidhan Parishad Election) मी विधानभवनातून निघालो.
आदल्या दिवशी मी अस्वस्थ होतो. त्या निवडणुकीत मला वाईट वागणूक देण्यात आली. हा काहीही करू शकतो,
असे माझ्याशी वागले. दोन्ही बाजूंच्या आमदारांना हे ठाऊक आहे. पक्षातील आमदारांवर अन्याय होत होता.
बाळासाहेब (Balasaheb Thackeray) म्हणाले होते अन्यायाविरूद्ध पेटून उठले पाहिजे, म्हणून मी अन्यायाविरोधात उभा राहिलो.

 

मी उठावासाठी निघालो तेव्हा मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फोन सुरू झाले. म्हणाले कुठे चाललात?
मी त्यांना सांगितले मला माहिती नाही. माझ्यासोबतच्या एकाही आमदाराने आपण कुठे जात आहोत,
काय करणार आहोत हे मला विचारले नाही. सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता.
शिवसेनेत माझे खच्चीकरण करण्यात आले. सुनील प्रभूंना (Sunil Prabhu) ते माहिती आहे.

 

भावूक होत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी सच्चा शिवसैनिक आहे, शिवसेना वाचविण्यासाठी लढून शहीद झालो तरी चालेल पण आता माघार नाही,
असा निर्धार करून निघालो. सोबत असलेल्या आमदारांना एवढाच विश्वास दिला की, तुमचे नुकसान होऊ देणार नाही.
तुमचे नुकसान होत आहे असे लक्षात येईल त्या क्षणी या जगाचा निरोप घेऊन निघून जाईन.

 

Web Title :- CM Eknath Shinde | 3-4 more mlas from shiv sena uddhav thackeray group will join cm eknath shindes group

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Period Cramps | मासिक पाळीच्या अवघड दिवसांत रामबाण आहेत ‘हे’ 7 उपाय, असह्य वेदनांपासून मिळेल आराम

 

Weight Loss Natural Drink | ‘वेट लॉस’साठी मदत करेल काकडी आणि कोथिंबिरीचे हे ‘डिटॉक्स ड्रिंक’, नोट करून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

 

Pune Crime | शेजार्‍याला मदत केल्याने महिला अडचणीत; अनाथ आश्रमात आली रहायची वेळ, वारजे माळवाडी परिसरातील घटना