Weight Loss Natural Drink | ‘वेट लॉस’साठी मदत करेल काकडी आणि कोथिंबिरीचे हे ‘डिटॉक्स ड्रिंक’, नोट करून घ्या बनवण्याची योग्य पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Natural Drink | वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी नियमित व्यायामासोबतच निरोगी आहाराची निवड आवश्यक असते. आहारातील अशाच एका आरोग्यदायी गोष्टीचे नाव आहे काकडी आणि कोथिंबिरीच्या पानांपासून बनवलेले डिटॉक्स ड्रिंक (Detox Drink). होय, काकडी आणि कोथिंबिरीच्या पानांपासून बनवलेले हे डिटॉक्स ड्रिंक वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते (Weight Loss Natural Cucumber And Coriander Leaves Detox Drink). या मिश्रणामुळे पोट बराच काळ भरलेले राहिल्याने वारंवार भूक लागत नाही.

 

कोथिंबीरमधील पोषक तत्व पोट थंड ठेवण्यास मदत करतात तर काकडी शरीर हायड्रेट करते. या दोन गोष्टींपासून बनवलेल्या डिटॉक्स ड्रिंक्समध्ये व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, रिबोफ्लेविन, फोलेट, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, फॉस्फरस, झिंक (Vitamin B6, Vitamin K, Vitamin C, Riboflavin, Folate, Calcium, Magnesium, Iron, Phosphorus, Zinc) यांसारखे अनेक पोषक घटक असतात. हे वजन कमी करणारे डिटॉक्स ड्रिंक कसे बनवायचे ते जाणून घेवूयात (Weight Loss Natural Drink Cucumber And Coriander Leaves Detox Drink Recipe For Quick Weight Loss)…

काकडी आणि कोथिंबिरीच्या पानांपासून वेट लॉस डिटॉक्स ड्रिंक तयार करण्यासाठी साहित्य (Cucumber And Coriander Leaves Detox Drink Ingredients) –

2 मध्यम आकाराची काकडी

1 कप कोथिंबीर

चवीनुसार मीठ

1 चिमूटभर काळी मिरी

 

काकडी आणि कोथिंबिरीच्या पानांनी वजन कमी करण्याचे डिटॉक्स ड्रिंक बनवण्याची कृती (Cucumber And Coriander Leaves Detox Drink Recipe) –

सर्वप्रथम काकडी नीट धुवून बारीक चिरून घ्या

ग्राइंडरमध्ये कोथिंबीर घालून चांगली बारीक करा.

आता ते एका ग्लासमध्ये काढा.

चवीनुसार मीठ आणि काळी मिरी पावडर घाला.

चांगले मिसळा.

आता तुमचे वजन कमी करण्याचे चविष्ट डिटॉक्स ड्रिंक तयार आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- weight loss natural drink cucumber and coriander leaves detox drink recipe for quick weight loss

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Police | पुणे पोलिस आयुक्तालयातील 3 निरीक्षक अन् 2 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या

 

CM Eknath Shinde | विधानसभेत CM एकनाथ शिंदे भावूक, झाले अश्रू अनावर

 

Assembly Speaker | राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षांमध्ये दुसरे तरुण अध्यक्ष; अजित पवारांनी सांगितले…