CM Eknath Shinde | पेट्रोल-डिझेलवरील दरात मोठी कपात, शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. आज झालेल्या कॅबिनेट बैठकिची (Cabinet Meeting) माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत दिली. आजच्या बैठकीमध्ये पेट्रोलच्या दरात 5 रुपये तर डिझेलच्या दरामध्ये 3 रुपये कपात करण्याचा निर्णय (Petrol, Diesel Rates Reduction) घेतल्याची माहिती शिंदे यांनी दिली. या निर्णयामुळे राज्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर सहा हजार कोटींचा बोझा पडणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, केंद्र सरकारने (Central Government) पेट्रोल-डिझेल वरील करकपात (Tax Deduction) केली होती. केंद्र सरकारकडून राज्य सरकारांना पेट्रोल-डिझेलवरील करकपात करण्याचे आवाहन केले होते. देशातील काही राज्यांनी करामध्ये कपात करुन जनतेला दिलासा दिला होता. मात्र महाष्ट्रात कर कपात करण्यात आली नव्हती.

 

राज्यात शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजपच्या (BJP) नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर इंधनावरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली होती. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. व्हॅट कपातीबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात बैठक झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

 

Web Title :- CM Eknath Shinde | Big reduction in petrol and diesel prices, Shinde-Fadnavis government announces

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sairat Fame Actor Arbaj Shaikh | सैराटमधील सल्याला पुण्यातील रिक्षावाल्यानं लुटलं ?, शिवीगाळ अन् मनस्ताप…

 

Maharashtra Rain Update | राज्यात पावसाचे थैमान ! आगामी 2 दिवस पावसाचा जोर कायम; अनेक जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’

 

Nilesh Rane | ‘… तर केसरकरांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत’ – निलेश राणे