CM Eknath Shinde | ‘आम्हाला आक्रमकपणा शिकवू नका, …मी 40 दिवस तुरुंगवास भोगलाय’; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपूर्वी झालेल्या सीमावादामुळे महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारला भरपूर टीका सहन करावी लागली. त्यात कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनामुळे हा दौरा लांबला. त्यामुळे विशेषकरून शिंदे गटावर उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार हल्ले सुरू होते. आता या हल्ल्यांना स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी नेभळट सरकार म्हणून टीका केली होती. या टीकेला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) यांनी उत्तर दिले आहे.

 

बेळगावीप्रश्नी केलेले कार्य आणि घेतलेल्या निर्णयांची आठवण त्यांनी उद्धव ठाकरेंना करून दिली. “बेळगावसंदर्भात काही लोक त्यांचं मत व्यक्त करत आहेत, पण मला त्यांना एवढेच सांगायचं आहे की आक्रमकपणा कसा दाखवायचा हे त्यांनी आम्हाला शिकवायची गरज नाही. बेळगावच्या प्रश्नावर मी ४० दिवस तुरुंगवास भोगला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बेळगावच्या जनतेला मिळणारे योजनांचे अनुदान बंद केले होते. आमच्या सरकारने संबंधित योजना पुन्हा सुरू केल्या आहेत. सीमेवरील गावांसाठीही म्हैसाळ पाटबंधारे योजनेचे विस्तारीकरण केले जात आहे, त्यासाठी राज्य सरकार २ हजार कोटी देत आहे,” असे मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांचा नियोजित बेळगावचा दौरा लांबणीवर
टाकण्याची नामुष्की येताच शिंदे- फडणवीस सरकारने आम्हाला बेळगावात जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही,
असे म्हणत सारवासारव सुरू केली आहे.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे अनुपस्थित राहिले, या मुद्द्यावरही एकनाथ शिंदेंवर हल्ला चढविला.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde on shivsena uddhav thackeray on belgaon issue delhi g20 meet

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nashik ACB Trap | 51 हजारांची लाच स्वीकारताना ठेकेदार पोलिसांच्या जाळ्यात; नाशिकमधील प्रकार

U-19 Women’s T20 WC | शफाली वर्माची Under 19 विश्वचषकासाठी महिला संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

Aurangabad ACB Tap | लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकासह कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात