CM Eknath Shinde | ‘…त्यांना जागा दाखवण्यासाठी ‘सावरकर गौरव यात्रा’ काढली’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना टोला (व्हिडिओ)

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांचा अपमान केल्याचा दावा करत भाजप (BJP) आणि शिवसेना Shivsena (शिंदे गट) हे आक्रमक झाले आहेत. दोन्ही पक्षांनी सावरकरांच्या सन्मानार्थ राज्यात ‘सावरकर गौरव यात्रा’ (Savarkar Gaurav Yatra) काढली आहे. ठाण्यातही ही यात्रा काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सहभागी झाले होते. या यात्रेच्या समारोपावेळी केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Thackeray Group Chief Uddhav Thackeray) आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, जाणीवपूर्वक हिंदुत्वाला (Hindutva) बदनाम करण्याचे काम काही लोक करत आहेत. सावरकरांचे विचार रोखण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. देशातला हिंदू आता जागा झाला आहे. जागरुक झाला आहे आणि तो आता सक्रीय झाला आहे. पण काही लोक त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी, त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी ही सावरकर यात्रा काढल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

 

 

उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, सावरकरांचा अपमान केल्यामुळे मणिशंकर अय्यर (Mani Shankar Iyer) यांना जोडे मारणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) वारसा सांगणारे लोक आता राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. ज्या राहुल गांधींनी वारंवार सावरकरांचा अपमान केला त्यांच्यासोबत बसण्याचं पाप काही लोक करत आहेत, हे आपल्या राज्याचं दुर्दैव आहे. परंतु आम्ही मात्र सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाहीय या सरकारमधील कोणतीही व्यक्ती ते खपवून घेणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. सावरकर हे देशभक्त होते,
राष्ट्रभक्त होते, प्रखर हिंदुत्ववादी होते. त्यांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही यात्रा काढली आहे.
पूर्वी लोक हिंदुत्व हा शब्द उच्चारायला कचरत होते. मात्र 2014 नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे
(PM Narendra Modi) हिंदुत्वाचा मान सन्मान जागा झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केलं.

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde participate in veer savarkar gaurav yatra and criticised oppostions


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

Kalyan Crime News | कल्याणमध्ये ‘कशिश’ बारमधून 28 बारबालांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

Pandit Dhirendra Shastri | ‘साईबाबा देव नाहीत’ पंडीत धीरेंद्र शास्त्रींचं वादग्रस्त विधान, रोहित पवारांचे भाजपला आव्हान, म्हणाले-‘हिम्मत असेल तर…’