Kalyan Crime News | कल्याणमध्ये ‘कशिश’ बारमधून 28 बारबालांना अटक; पोलिसांची मोठी कारवाई

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – कल्याणमध्ये (Kalyan Crime News) पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये ऑर्केस्ट्रा बारच्या नावाने अश्लील नृत्यू सुरू असलेल्या लेडीज बारवर कोळसेवाडी पोलिसांच्या (Kolsevadi Police) पथकाकडून छापेमारी करण्यात आली आहे. या बारचे नाव कशिश बार (Kashish Bar) असे आहे. पोलिसांनी जेव्हा या ठिकाणी छापा (Raid) टाकला तेव्हा 28 बारबाला अश्लिल नाच करताना आढळून आल्या. यावेळी पोलिसांनी बारबालांसोबत अय्याशी करणाऱ्या ग्राहकांसह बारचे मालक आणि कर्मचाऱ्यासह 23 जणांना अटक केली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (Kolsevadi Police Station)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कल्याण पूर्वेतील नांदिवली गावाच्या हद्दीत असलेल्या ‘कशिश’ बारवर गुरुवारी 30 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास हि छापेमारी करण्यात आली. या छापेमारीत पोलिसांनी 28 बालबालांसह इतरांना ताब्यात घेतले आहे. या बारमध्ये केवळ 4 गायिकांना ठेवण्याची परवानगी असताना तब्बल 28 बारबाला बारचालकाने ठेवल्यामुळे हि कारवाई करण्यात आली आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख (Senior Police Inspector of Kolsevadi Police Station Mahendra Deshmukh) आणि डीबी पथकाचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने हि कारवाई केली आहे.

कोळसेवाडी पोलीस ठाण्यात 28 बारबालांसह बार मालक समेश्वर बहादूर उमाशंकर सिंह
(Bar owner Sameshwar Bahadur Umashankar Singh), मॅनेजर, वेटर , ग्राहक अशा 23 पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
अशी माहिती माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.
विशेष म्हणजे यापूर्वीदेखील ‘कशिश’ डान्सबारवर पोलीस पथकाने 7 वेळा छापेमारी केली होती.

 

Web Title :- Kalyan Crime News | kalyan kashish dance bar police raid arrest 28 bar dancers and case filed against 23


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा; ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब,
इऑन वॉरीयर्स संघांची विजयी कामगिरी !!

Pune Crime News | पुण्यातील बिल्डरची 2.54 कोटींची फसवणूक, 3 बिल्डरसह बँक संचालक, मॅनेरज, आणि एमडी यांच्यावर FIR

Kolhapur Crime News | माजी सरपंच पत्नीची पतीच्या वाढदिवसादिवशीच आत्महत्या; कोल्हापूरमधील घटना

Narayan Rane | ‘शरद पवारांनी चिंता करु नये, लवकरच…’, शरद पवारांच्या ‘त्या’ विधानावर नारायण राणेंचं मोठं विधान

Pune Crime News | येरवडा कारागृहातील कैद्यांमध्ये हाणामारी; दोन न्यायालयीन कैदी जबर जखमी