CM Eknath Shinde | ‘हे लोक स्वत: चं कुटुंब सांभाळू शकले नाहीत, आघाडी कशी काय सांभाळणार?’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Political News | केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) विरोधात देशभरातील विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या (India Alliance) नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत (Mumbai) झाली. या बैठकीला देशभरातील 28 पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. (Maharashtra Political News) या बैठकीबद्दल देशभरात चर्चा चालू आहे. तसेच या बैठकीवर सत्ताधारी भाजपाकडून (BJP) टीका सुरू आहे. तर एनडीएतील (NDA) घटक पक्षांचे नेतेही इंडिया आघाडीला लक्ष करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी इंडिया आघाडीवर तसेच मुंबईतल्या बैठकीचे यजमानपद भूषवणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचावर टीका केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, विरोधकांच्या या आघाडीला इंडिया म्हणू नका. त्याचं नाव I.N.D.I.A असं आहे. या आघाडीतील लोक स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. स्वार्थापलिकडे त्यांना काही दिसत नाही. केवळ आपल्या कुटुंबाचं भलं करणं इतकंच त्यांना माहीत आहे. हे सगळे लोक मोदीद्वेषाने पछाडले आहेत. आता पर्यंत हे लोक स्वत:चा नेता जाहीर करू शकले नाहीत. स्वत:चा लोगो एकमताने जाहीर करू शकले नाहीत. यावरून त्यांची किती एकजूट आहे ते दिसतंय. हे प्रचंड स्वार्थाने पछाडलेले लोक आहेत. विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर (PM Narendra Modi) पंतप्रधानपदासाठी एक उमेदवार उभा करू शकत नाहीत हेच त्यांच सर्वात मोठ अपयश आहे.

मुख्यमंत्र्यांची इंडिया आघाडीवर टोलेबाजी

मुख्यमंत्री म्हणाले, केवळ स्वार्थासाठी ही टोळी एकत्र आली आहे.
हे लोक भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहेत, परंतु, यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही.
त्यांच्यातील लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav), नितीश कुमार (Nitish Kumar), अरविंद केजरीवाल
(Arvind Kejriwal) या सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे (FIR) दाखल आहेत.
त्यांनी अश्या आघाड्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी (Lok Sabha Election),
2019 च्या निवडणुकीवेळी बनवल्या होत्या. परंतु, त्यावेळी त्यांचा सुपडा साफ झाला होता. 2024 च्या निवडणुकीत जनता त्यांना घरचा रस्ता दाखवेल.

आघाडी कशी काय सांभाळणार?

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, हे लोक त्यांचा संयोजक किंवा लोगो ठरवू शकत नाहीत.
ज्यांनी या बैठकीचं संयोजन केलं आहे ते स्वत:चा पक्ष सांभाळू शकले नाहीत. स्वत:च्या कार्यकर्त्यांना सांभाळू शकले नाहीत.
80 टक्के पक्ष दुसरीकडे गेला. त्यानंतर खरी शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता मिळाली.
पक्षाचे चिन्ह (Party Symbol) म्हणजे धनुष्यबाण आम्हाला मिळालं.
आम्ही आता बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची भूमिका घेऊन पुढे चाललो आहोत.
हे लोक स्वत:चं कुटुंब सांभाळू शकले नाहीत, आघाडी कशी काय सांभाळणार? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘वन नेशन वन इलेक्शन’ यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मांडले मत; म्हणाले “या निर्णयाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस…”

PM Narendra Modi | मोदी पुण्यातून निवडणूक लढवणार का? यावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, “हा त्यांचा अधिकार…”