CM Eknath Shinde |  ‘वज्रमूठ’ नव्हे, ही तर ‘वज्रझूट’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ‘मविआ’ला टोला (व्हिडिओ)

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीची पहिला ‘वज्रमूठ’ सभा (MVA Vajramuth Sabha) छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. या सभेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. जेव्हा चांगले लोक एकत्र येतात तेव्हा त्याला ‘वज्रमूठ’ म्हणतात, ही तर ‘वज्रझूट’ आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी लगावला. ठाण्यात ‘सावरकर गौरव यात्रे’चं (Savarkar Gaurav Yatra) आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी मविआला लक्ष्य केलं. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपण 9 एप्रिलला अयोध्येला जाणार असल्याचे सांगितले.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले, सभा घेण्याची परवानगी सर्वांना आहे, पण सावरकरांच्या अपमान करणाऱ्यांसोबत ही सभा होत आहे. बाळासाहेबांचं हे आवडीचं शहर होतं. बाळासाहेबांनी संभाजीनगरची मागणी केली होती आणि आज तिथेच ही सभा होत आहे. बाळासाहेबांनाही हे पाहून दु:ख होत असेल. सावरकरांनी देशासाठी समुद्रात उडी टाकली, हे सत्तेसाठी कोलांट्याउड्या मारतात. राज्यातील जनता सुज्ञ आहे, त्यांना चोख उत्तर देईल, असेही त्यांनी सांगितले.

 

नाना पटोले (Nana Patole) सभेसाठी अनुपस्थित राहण्यासंबंधी विचारण्यात आले असता त्यांनी सांगितलं की, हे तीन तिघाडा, काम बिघाडा आहे. हे सत्तेसाठी एकत्र आले आहे, विचारांसाठी नाही. शिवसेना-भाजपची युती (Shiv Sena-BJP Alliance) ही विचारांची युती होती. अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee), प्रमोद महाजन (Pramod Mahajan), बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray), गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी एका विचाराने युती केली. मात्र 2019 मध्ये त्यांनी सत्तेसाठी विचार बाजुला ठेवले. त्यांना सत्ता आणि खुर्चांसाठी तिलांजली दिली.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे याना दगड म्हणून संबोधलं होतं.
यावर विचारले असता ते म्हणाले, प्रभू श्रीरामाच्या हाताच स्पर्श झाल्यानंतर ते दगड तरंगत होते.
पण हे जे दगड एकत्र आले आहेत, ते पाण्यात टाकल्यावर लगेच बुडून जातील.
हे सगळे छोटे, मोठे दगड एकत्र आले असून त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, अशी टीका त्यांनी महाविकास आघाडीवर केली.

 

Web Title :- CM Eknath Shinde | Not ‘Vajramuth’, but ‘Vajrazoot’, Chief Minister Eknath Shinde’s attack on ‘Mavia’ (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MVA Vajramuth Sabha | ‘मविआ’च्या सभेला ‘हा’ बडा नेता राहणार गैरहजर, कारणही आलं समोर

Subhash Desai | मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुभाष देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले-‘त्याचं राजकीय अस्तित्व…’

CM Eknath Shinde | ‘…त्यांना जागा दाखवण्यासाठी ‘सावरकर गौरव यात्रा’ काढली’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना टोला (व्हिडिओ)