Pune Crime News | मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पानटपरी चालकाला धारदार हत्याराचा धाक दाखवून मारहाण करुन गल्ल्यातील पैसे जबरदस्तीने (Robbery In Pune) काढून घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या कोंढवा (Kondhwa) येथील गणेश कोरडे याच्यासह इतर 2 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. मोक्का गुन्ह्यात फरार (Absconding Criminal In MCOCA Case) असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) युनिट -5 च्या पथकाने अटक केली आहे. (Pune Crime News)

साहिल अर्जुन कचरावत Sahil Arjun Kashrawat (वय-22 रा.सातवनगर, होंडवाडी रोड, कंजारभाट वस्ती, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट-5 चे पथक गुरुवारी (दि.14) हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार राजस शेख व पृथ्वीराज पांडुळे यांना माहिती मिळाली की, कोंढवा पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी साहिल कचरावत हा महमंदवाडी वनीकरण जंगलात लपून बसला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी तरवडेवस्ती येथील वनीकरण जंगलात आरोपीचा शोध घेतला असता तो एका झाडाच्या बुंद्याजवळ बसलेला दिसला. आरोपी आणि पोलिसांची नजरानजर होताच तो पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. आरोपी साहिल कचरावत याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात आयपीसी 386, 504, 506 (2), आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्या ताब्यात दिले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त सतिश गोवेकर (ACP Satish Govekar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (PI Mahesh Bolkotg), सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krushna Babar), पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे (PSI Avinash Lahote), चैताली गपाट (PSI Chaitali Gapat), पोलीस अंमलदार राजस शेख, प्रमोद टिळेकर, दया शेगर, पृथ्वीराज पांडुळे, दाऊद सय्यद, विनोद शिवले, अकबर शेख, विलास खंदारे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचे आंदोलक संतप्त, विखे-पाटील न आल्याने सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला गुन्हे शाखेकडून अटक, 5 गुन्हे उघडकीस

Pune Metro- Ganeshotsav 2023 | पुणेकरांनो लाडक्या बाप्पाला आणा मेट्रोमधून, पुणे मेट्रोकडून नियमावली जाहीर

ACB Trap Case | PhonePe वर लाच घेणाऱ्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

ऑनलाइन टास्क देत तरुणाची 31 लाख 30 हजारांची फसवणूक, हडपसरमधील प्रकार

पत्नीला मारहण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका, घरात प्रवेश बंदी

Nashik Crime News | पती, पत्नी आणि त्याची गर्लफ्रेण्ड…, सततच्या छळा वैतागून तिनं उचललं टोकाचं पाऊल; नाशिक शहरात खळबळ