Pune Crime News | बसमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला गुन्हे शाखेकडून अटक, 5 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहर व परिसरात पीएमपीएमएल बसमध्ये (PMPML Bus) गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या (Mobile Theft) परप्रांतीय चोरट्याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून पाच गुन्हे उघडकीस आले असून 91 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Pune Crime News)

मायकेल रुद्रनाथ दुर्गा (वय-23 सध्या रा. पुणे स्टेशन फिरस्ता, मुळ रा. पुर्भगोट, जि. जाचपुररोड, उडिसा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे शहरात बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल चोरण्याच्या (Mobile Missing) घटनांमध्ये वाढ झाली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना शोधून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाला दिले होते. त्यानुसार युनिट दोनचे पथक स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. (Pune Crime News)

पेट्रोलींग करत असताना पोलीस अंमलदार मोहसीन शेख यांना माहिती मिळाली की, मोबाईल चोरी करणारा चोरटा स्वारगेट कॅनल जवळ थांबला असून त्याच्याकडे असलेल्या काळ्या रंगाच्या सॅकमध्ये चोरीचे मोबाईल आहेत. मिळालेल्या माहितवरुन पोलिसांनी स्वारगेट कॅनल जवळून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता सात मोबाईल फोन मिळाले. आरोपीकडून 91 हजार 200 रुपयांचे 7 मोबाईल जप्त केले आहेत. आरोपीने पुणे शहर व पिंपरी-चिंचवड भागातून पीएमपीएमल बसमधून चोरल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून शिवाजीनगर (Shivaji Nagar Police Station), स्वारगेट (Swargate Police Station), निगडी (Nigdi Police Station), चाकण (Chakan Police Station), हडपसर पोलीस ठाण्यातील (Hadapsar Police Station) गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कमगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त (गुन्हे) अमोल झेंडे (DCP Amol Zende), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 सुनिल तांबे (ACP Sunil Tambe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई (Senior PI Nandkumar Bidwai), सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते (API Vishal Mohite), पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble) पोलीस अंमलदार मोहसीन शेख, शंकर नेवसे, विनोद चव्हाण, उज्वल मोकाशी, साधना ताम्हाणे, निखिल जाधव, पुष्पेंद्र चव्हाण, विजयकुमार पवार, अमोल सरडे, राहुल राजपुरे, गजानन सोनुने, नागनाथ राख यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dhangar Reservation | धनगर आरक्षणाचे आंदोलक संतप्त, विखे-पाटील न आल्याने सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

Pune Metro- Ganeshotsav 2023 | पुणेकरांनो लाडक्या बाप्पाला आणा मेट्रोमधून, पुणे मेट्रोकडून नियमावली जाहीर

ACB Trap Case | PhonePe वर लाच घेणाऱ्या विशेष वसुली व विक्री अधिकाऱ्याला एसीबीकडून अटक

ऑनलाइन टास्क देत तरुणाची 31 लाख 30 हजारांची फसवणूक, हडपसरमधील प्रकार

पत्नीला मारहण करणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका, घरात प्रवेश बंदी

Nashik Crime News | पती, पत्नी आणि त्याची गर्लफ्रेण्ड…, सततच्या छळा वैतागून तिनं उचललं टोकाचं पाऊल; नाशिक शहरात खळबळ