मान्सूनला विलंब झाल्याने पेरण्या उशीरा करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – यंदा मान्सून सरासरी बरसणार आहे. असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मात्र मान्सून यंदा लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या उशीरा कराव्यात. असं आवाहन सरकारने केले आहे. यावर्षी ३ दिवसात ५ कोटी शेतकऱ्यांना असे मेसेज पाठविले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मराठवाड्यात केवळ ३८ ते ४० टक्के पाऊस पडला. तरीही कमी पावसातदेखील राज्याची उत्पादकता वाढली आहे. असंही ते म्हणाले.

मुंबईत खरीपाच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री व राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्या बैठकिनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

राज्यात यावर्षी बऱ्यापैकी पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. मात्र मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा पेरण्या उशीरा कराव्यात असं आवाहन सरकारतर्फे केलं आहे. गेल्या वर्षी यासंदर्भातील आवाहन करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी सरकारने ४० कोटी शेतकऱ्यांना यांसदर्भातले एसएमएस पाठवले होते. तर यंदा ३ दिवसात ५ कोटी शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. असे मुख्यमंत्री म्हणाले.

गेल्या वर्षी कमी पावसातही जास्त उत्पादन
राज्यातील एकूण शेती क्षेत्रापैकी सर्वाधिक ५५ ते ६० टक्के क्षेत्र कापूस आणि सोयाबीनचे आहे. तर १० टक्के भात, ८ टक्के ऊस, ११ टक्के मका या पिकांचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी ७३ टक्के पाऊस पडला. तर मराठवाड्यात ५० टक्क्यापेक्षा कमी ३८ ते ४० टक्के पाऊस पडला. मात्र राज्यात जलसंधारणाची कामे केली. त्यामुळे कमी पावसातही जास्त उत्पादन घेता आले. मागील वर्षी कापसाची उत्पादकता १७ टक्के वाढली. सोयाबीनचीही उत्पादकता वाढली. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

पावसावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न राज्य सराकरकडून करण्यात येत आहेत. त्यासाठी जलसंधारणाची कामे जास्तीत जास्त करण्यावर भर दिला जाणार आहे.

असा आहे आयएमडीचा पावसाचा अंदाज

कोकण आणि गोवा – ९३ – १०७ टक्के

मराठवाडा – ८९ – ११७ टक्के

विदर्भ – ९२ ते १०८ टक्के

You might also like