CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरेंची टोलेबाजी ! भाजपवर टीका करत म्हणाले…

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –  CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज (मंगळवारी) बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत इन्क्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) देखील उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपाला (BJP) टोला लगावला आहे.

 

उद्घाटना दरम्यान बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, चांगल्या कामात अडथळे आणले जातायंत हे चुकीचे आहे. आम्ही नाही ती अंडी उबविली असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्ष भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. सर्व पवार कुटुंबीय हे विकासाच्या ध्यासात रमलंय. फक्त विकासाचे काम करतात. राजकारणात टीकाकार असतात आणि असलेच पाहिजे. आम्हीसुद्धा तुमचे एकेकाळी टीकाकार होतो. राजकारणात पटत नाही म्हणून चांगल्या कामात अडथळे आणणे ही आपली संस्कृती नाही. असं ते म्हणाले.

राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्हीही उघडलं होतं 25-30 वर्ष. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात. अशा गोष्टी घडत असतात. आपलं काम आपण केलं. पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. दरम्यान त्यावेळी उद्धव ठाकरेंनी पवार कुटुंबियांचे कौतुक केले. पवार कुटुंब विकासात रंगल आहे. राजकारणात विघ्नसंतोषी खूप आहेत, ते असतातच, परंतु याकडे दुर्लक्ष करुन आपल्या कामात गुंतुन ते तडीस नेणे आवश्यक आहे. ते काम पवार कुटुंबिय करत आहेत. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

 

Web Title : CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray criticism on bjp in baramati of pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nawab Malik | नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट ! म्हणाले – ‘समीर वानखेडे PM मोदींहून पुढे गेले; 1 लाखाची पँट, 70 हजारांचा शर्ट, अन्…’

Organ Donation | 14 वर्षाच्या ब्रेन डेड मुलानं पुण्यातील व्यक्तीसह 6 गरजूंना दिलं ‘जीवदान’ ! हृदय, फुफ्फुस, डोळे, लीव्हर आणि दोन्ही हात आई-वडिलांनी केले ‘दान’

Deglur Assembly bypolls result | भाजपाला धक्का ! देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विजयी