CM Uddhav Thackeray | CM उद्धव ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना मानेचा त्रास होत होता. यामुळे शस्त्रक्रिया (Surgery) करण्याचं डाॅक्टरांनी सांगितलं होतं. यासाठी त्यांना बुधवारी एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर, आता मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील आज (शुक्रवारी) शस्त्रक्रिया सुरू झाली होती. वरिष्ठ आँर्थो सर्जन डॉक्टरांनी (Senior Ortho Surgeon Doctor) जवळपास तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी पाऊने नऊ वाजता शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

 

दरम्यान, अनेक तपासण्या झाल्यानंतर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला होता. यापुर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर आधी घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली होती. पंरतु, पुन्हा एकदा मान व पाठदुखीचा त्रास होऊ नये यासाठी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा पर्यायी सल्ला दिला होता. त्यानंतर आता शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

 

Web Title :- cm uddhav thackeray surgery successful hospital in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा