CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक विशेष संधी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा (Government Service Examination) होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा (Maximum age limit) ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून स्पर्धा परीक्षांना बसण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या या निर्णयामुळे एमपीएससीच्या (MPSC) अनेक विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने आज काढला आहे.

 

कोविडमुळे मागील दोन वर्षापासून एमपीएससी आणि सरळसेवेच्या भरती प्रक्रिया होऊ शकल्या नव्हत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा कोरोनामुळे दोन वर्षे झालेल्या नाहीत. अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढलेली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवा अशी मागणी होती. याबाबत आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet meeting) चर्चा झाली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मान्यता दिली आहे.

 

या शासन निर्णयात म्हटले आहे की,  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात 1 मार्च 2020 पासून जाहिराती प्रसिद्ध न झाल्यामुळे शासनाने संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे किंवा संदर्भाधीन 25 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा, दि. 01 मार्च 2020 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत, ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे, अशा उमेदवारांना या शासन निर्णयाच्या दिनांकापासून दि.31 डिसेंबर 2022 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात ज्या जाहिराती प्रसिद्ध होतील, त्या जाहिरांतीसाठी “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस (Exam) बसण्याची संधी देण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या
असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक,
या शासन निर्णयाच्या दिनांकानंतरचा असेल, अशा प्रकरणी देखील 1 मार्च 2020 ते
या शासन निर्णयाच्या दिनांका पर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे
किंवा संदर्भाधीन दि. 25 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे.
अशा उमेदवारांसाठी देखील “एक वेळची विशेष बाब” म्हणून परीक्षेस बसण्याची संधी देण्यात येत आहे.

 

 

कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाल्याने ज्या प्रकरणी नजीकच्या काळात जाहिराती प्रसिद्ध झाल्या
असून जाहिरातींमध्ये नमूद केलेला अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक या शासन निर्णयाच्या दिनांकापूर्वी उलटून गेला आहे.
मात्र प्रत्यक्षात परीक्षांचे आयोजन (Conducting exam) करण्यात आलेले नाही,
अशा प्रकरणी देखील दि. 01 मार्च 2020 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंतच्या कालावधीत संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमाद्वारे
किंवा संदर्भाधीन दि. 25 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयाद्वारे नियुक्तीकरिता विहित केलेली कमाल वयोमर्यादा ज्या उमेदवारांनी ओलांडली आहे.
अशा उमेदवारांसाठी अर्ज सादर करण्यास्तव महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission)
अथवा संबंधित निवड समितीने “एक वेळची विशेष बाब” म्हणून परवानगी द्यावी. जेणेकरून त्यांना देखील परीक्षेस बसण्याची संधी प्राप्त होईल.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | maharashtra mpsc exam increased opportunities for mpsc cm uddhav thacekeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitin Gadkari | जेव्हा गडकरींवर नाराज झाले होते बाळासाहेब आणि धीरूभाई अंबानी ! केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले – ‘कसे रिलायन्सचे टेंडर रिजेक्ट करून वाचवले होते 2000 कोटी’

Omicron Variant | पुण्याच्या ग्रामीण भागात ओमायक्रॉनची ‘एन्ट्री’, जून्नरमध्ये 7 रुग्ण आढळले

 

Pune Corona | ग्रामीण भागात ओमायक्रॉनच्या एन्ट्रीने चिंता वाढली, पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 73 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी