येत्या रविवारी उद्धव ठाकरेंची नगरमध्ये सभा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन   – येत्या रविवारी नगरमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे यांची शिर्डी आणि नगरमध्ये जाहिर सभा होणार आहे. याच सभेत नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा उद्धव ठाकरे करू शकतात. या मतदारसंघातून घनशाम शेलार, उपनेते अनिल राठोड, आ. विजय औटी, माजी महापौर भगवान फुलसौंदर या चौघांच्या नावाची आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3ccba8d7-d132-11e8-8c46-59128a3ccc12′]
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या २१ रोजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. दक्षिण जिल्ह्याची नगरमध्ये तर उत्तर जिल्ह्याची शिर्डीत अशा दोन सभा ते घेणार आहेत. दक्षिणेची जबाबदारी प्रा. शशिकांत गाडे व उत्तरेची जबाबदारी रावसाहेब खेवरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नगरमध्ये न्यू आर्टस महाविद्यालयाच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे नगर दक्षिण मतदारसंघातील उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वक्ता शिबिरासाठी चार दिवसांपूर्वी मंत्री रामदास कदम नगरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी नगर दक्षिण व शिर्डी लोकसभेच्या जागेचा आढावा घेतला असता घनशाम शेलार यांच्या नावावर चर्चा केली. त्यामुळे सध्या तरी शेलार यांचे नाव आघाडीवर आहे.

[amazon_link asins=’B07D9G1GHB,B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c48d0265-d134-11e8-bd6c-af4a31cb900f’]

आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा दस्तुरखुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच त्यांनी विभागनिहाय बैठका घेऊन लोकसभा निवडणुकीची चाचपणी केली आहे. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, पारनेरचे आमदार विजय औटी यांच्या रूपाने जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार व एकच आमदार आहे.

जाहिरात