पुरुषांना असतो ‘या’ 4 कॅन्सरचा सर्वाधिक जास्त धोका ! जाणून घ्या कारणांसहित तपासण्यांची सविस्तर माहिती

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पुरुष आणि महिलांना होणारे कॅन्सर वेगवेगळे आहेत. हार्ट अटॅकनंतर जगभरात कॅन्सरमुळं लोकं मरत आहेत. 2018 च्या डेटानुसार 185 देशात साधारणपणे 36 कॅन्सरचे प्रकार आहेत. यात भारतीय पुरुषांना होणाऱ्या 4 कॅन्सरबद्दल आपण माहिती घेणार आहोत. जर सुरुवातीलाच तुम्हाला कॅन्सरच्या स्थितीबद्दल माहित पडलं तर तुम्ही उपचार घेऊन बरे होऊ शकता. यासाठी आवश्यक काही तपासण्यांचीही माहिती घेणार आहोत.

1) तोंडाचा कॅन्सर – भारतात हा कॅन्सर सर्वात जासत दिसून येतो. कारण इथं तंबाखू, पान, गुटखा आणि दारूचं सेवन करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. अशा पदार्थांच्या सेवनानं तोंडाच्या बाहेरच्या बाजूला ट्युमर येतो. ओठ, गाल यांच्या मार्फत कॅन्सर मोठा होतो. तुम्ही सीटी स्कॅन किंवा एमआरआय करून कॅन्सरची तपासणी करू शकता.

2) फुप्फुसाचा कॅन्सर – कॅन्सरचा हा प्रकार भारतासह जगभरात जास्त दिसून येतो. याचं कारण आहे ते म्हणजे धुम्रपान, दारू, हुक्का यांचं अतिसेवन. या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी सीटी स्कॅन किंवा LDCT टेस्ट केली जाते. मुख्य म्हणजे 55 ते 75 वयोगटातील लोकांना या प्रकारचा कॅन्सर दिसून येतो.

3) प्रोस्टेट कॅन्सर – हा कॅन्सर फक्त पुरुषांनाच होतो. हा कॅन्सर प्रोस्टेट ग्लँड्सला प्रभावित करतो. पुरुषांमध्ये वीर्य आणि मुत्र नियंत्रित करण्यासाठी या ग्रंथी महत्त्वाच्या असतात. रेडिओथेरपीद्वारे हा आजार बरा केला जाऊ शकतो. याला Prostate Specific Antigen टेस्टही म्हटलं जातं.

4) पोटाचा कॅन्सर – आतड्यामध्ये लहान लहान गाठी तयार होतात तेव्हा शरीरात कोलन कॅन्सरची सुरुवात होतं. पुढे जाऊन याच गाठी कॅन्सरचं कारण ठरतात. यासाठी फ्लेक्सिबल सिग्मॉइडोस्कोपी (Flexible Sigmoidoscopy), कोलोनोस्कोपी (Colonoscopy), डबल कॉन्ट्रास्ट बेरियम एनीमा (Double Contrast Barium Enema) आणि सीटी कोलोनोग्राफी (CT Colonography), व्हर्चुअल कोलोनोस्कोपी (Virtual Colonoscopy) अशा टेस्ट करून रक्ताची तपासणी केली जाते. मल तपासणी करताना अनेकदा डीएनए टेस्टदेखील करावी लागते.