दोन पोलीस अधिकाऱ्यांविरोधात खंडणीची तक्रार

बोईसर : पोलीसनामा ऑनलाईन- बोईसर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस उपनिरीक्षकांबाबत खंडणीची तक्रार आली असतानाच पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्या विशेष पथकातील अधिकाऱ्यांविरोधात पोलीस अधीक्षक सिंह यांनी खंडणीबाबत तपास सुरु केला आहे. सिंह यांनी तपास सुरु केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

मागील दोन वर्षापासून या पथकातील अधिकारी आणि झीरो पोलिसांद्वारे अवैध धंद्यावर कारवाई करण्यात येते, अवैध धंदेवाल्यांना हप्त्यासाठी त्रास देतात आणि त्यांना मारहाण करतात अशी तक्रार एका खासगी व्यक्तीने केली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजू दुबे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन पोलीस अधिकाऱ्यांबाबत त्यांच्या सहभागाबाबत पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी स्वत: तपास सुरु केला आहे.

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील एका व्यापाऱ्यास अशाच प्रकारे काही दिवसापूर्वी अवैध गुटखाप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. यानंतर राजु दुबे या हस्तकामार्फत त्यांचाकडे ५ लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती व यासाठी तगादा ही लावण्यात आला होता. याप्रकरणी व्यावसायिकाने पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली.

त्यानंतर २ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री उशीरा खाजगी हस्तक राजु दुबे यांच्यावर कारवाई करण्यात आली. बोईसर पोलीस ठाण्यात त्याचाविरोधात भा. दं. वि.कलम ३८४, ३८९, २१३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात व सहायक पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र शिवदे यांच्या सहभागाबाबत पुढील तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गौरव सिंह यांनी दिली.

You might also like