लोकसभा 2019 : काॅंग्रेसकडून आणखी 7 उमेदवार जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसने शुक्रवारी रात्री आणखी 7 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यात काँग्रेसचे महासचिव ज्योतिरादित्य सिंधिया यांना गुना लोकसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे. सिंधिया हे याच मतदारसंघाचे खासदार आहेत. माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी हे पंजाबमधील आनंदपूर साहिब येथून निवडणुक लढविणार आहे.

ज्योतिरादित्य शिंदिया यांच्याकडे या निवडणुकीत पश्चिम उत्तर प्रदेशाची जबाबदारी देऊन त्यांना प्रभारी बनविण्यात आले आहे. त्यामुळे ते पुन्हा गुना मधून निवडणुक लढणार की पश्चिम उत्तर प्रदेशातील एखाद्या मतदारसंघातून त्यांना निवडणुक लढविण्यास सांगितले जाईल, असा कयास लावला जात होता. आता त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे.
मध्य प्रदेशातील विदिशामधून शैलेंद्र पटेल, राजगढमधून मोना सुसतानी, पंजाब च्या संगरुरमधून केवलसिंह ढिल्लो यांना उमेदवारी देण्यात आली आहे.