काय सांगता ! होय, राजस्थानमध्ये मध्यरात्री 2.30 वाजता काँग्रेसची पत्रकार परिषद !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – राजस्थानमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे काल दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी रात्री 2.30 वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी काँग्रेसने 109 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. जयपूरमध्ये गेहलोत यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद पार पडली.

विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर काँग्रेसकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे नी यावेळी सांगितले की, 109 आमदारांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वाखालील राजस्थान सरकारसह सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्याच्या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. सचिन पायलट यांनी पक्षाच्या 30 आमदारांसह काही अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत अशोक गेहलोत सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला.

राजस्थानातील काँग्रेसचे सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी सचिन पायलट यांना चौकशीसाठी नोटीस बजावल्याने त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे खंदे समर्थक आणि संघटनात्मक महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी गेहलोत आणि पायलट यांच्या विकोपाला गेलेल्या सत्तासंघर्षांचा अहवाल राहुल यांना दिला. त्यात पायलट यांना पाठवलेल्या नोटिसीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राहुल गांधी आणि पक्षाच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी पायलट यांनी रविवारी दिल्लीत ठाण मांडले होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like