काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून दूर नेतय, भाजपच्या ‘या’ दिग्गज नेत्यानं सांगितलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्वापासून हळूहळू दूर नेत आहे. हे योजनाबद्ध सुरु आहे. मराठी माणूस आणि हिंदूंचा रक्षणकर्ता पक्ष अशी जी शिवसेनेची ओळख होती ती मनसेकडे जावी. राज्यातील शिवसेनेची जागा मनसेने घ्यावी असा या मगाचा डाव असून हा डाव उद्धव ठाकरे यांनी वेळीच ओळखावा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आपण शिवसेनेचा हितचिंतक असल्याचे सांगत शिवसेनेला न मागता सल्ला दिला आहे.

सीएए कायदा राज्यात लागू करावा
सीएए कायदा देशातून कोणालाही बाहेर काढण्यासाठी केला नाही. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी तयार करण्यात आला आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याकडे लक्ष वेधताना चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे या कायद्याशी सहमत असतील तर त्यांनी हा कायदा राज्यात लागू करावा. राज्यात या कायद्याविरोधात सुरु असलेली आंदोलने थांबवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सरकारने भान राखायला हवे

आमच्या काळात सुरु केलेल्या योजना रद्द करण्यात येत आहे. योजना रद्द केल्यातरी आमची काहीही हरकत नाही. मात्र, योजना रद्द करताना त्याला पर्यायी योजना सुरु करायची असते, याचे भान सरकारने राखायला पाहिजे असे चंद्रकांत पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात पाठवले जाणार असल्याबाबत विचारले असता यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.