विधानसभा 2019 : काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, प्रियंका गांधीसह इतर दिग्गजांचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल संपली. त्यानंतर आता विविध राजकीय पक्षांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेस नेते शत्रुघन सिन्हा यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

सत्तेत पुन्हा परतण्यासाठी आणि लोकांची मने जिंकण्यासाठी काँग्रेसने आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी घोषित केली आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, प्रियंका गांधी यांचा यामध्ये समावेश आहे. यामध्ये प्रियांका गांधी या सातव्या क्रमांकावर आहेत.

पहिल्या 20 जणांमध्ये शत्रुध्न सिन्हा
सिन्हा यांचे नाव देखील 20 स्टार प्रचारकांच्या यादीत असून त्यांचे नाव पहिल्या 20 लोकांमध्ये आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कमलनाथ भूपेश बघेल आणि सचिन पायलट हे सिन्हा यांच्यावर आहेत.

त्याआधी हरियाणाच्या निवडणुकीसाठी देखील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली होती. त्याचबरोबर यामध्ये नवज्योत सिंह सिद्धू यांचे नाव मात्र नाही. या यादीत अशोक गहलोत, गुलाम नबी आजाद, सचिन पायलट यांच्या नावाचा समावेश आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये 21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Visit : Policenama.com