काँग्रेस आमदाराचा राजीनामा, CM च्या उपस्थित भाजपात प्रवेश

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशमध्ये (madhya pradesh) पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपकडून (bjp) काँग्रेसला (congress) धक्का देण्यात आला आहे. काँग्रेस आमदार प्रद्युम्नसिंह लोधी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्यानंतर, आता आपल्या लहान भावालाही भाजपात घेतले आहे. दमोह विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहुल लोधी (rahul lodhi) यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (chief minister shivraj singh chouhan) यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

प्रद्युम्न लोधी यांच्या प्रवेशानंतर राहुल लोधी हे देखील भाजपात दाखल होणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून होती. मात्र, त्यावेळी राहुल यांनी काँग्रेस सोडणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आज राहुल यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्याकडे आपल्या आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला, त्यानंतर त्यांनी जाहीरपणे भाजपमध्ये प्रवेश केला.

तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंह दमोह येथे 2003 मध्ये आले होते. त्यावेळी राहुल लोधी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते आजतागायत ते काँग्रेसचा हाथ धरुन चालत होते. भाजपच्या गडाला हादरा देत लोधी यांनी काँग्रेसची ताकद वाढवून पक्षाचा आमदार या मतदारसंघात निवडून आणला. काँग्रेसनेच मला आमदार केलंय. त्यामुळे, मी काँग्रेस सोडणार नाही, असेही लोधींनी जाहीरपणे म्हटले होते. मात्र, पोटनिवडणुकीच्या अगोदरच त्यांनी संधी साधून भाजपात प्रवेश केला.