Congress Mohan Joshi – Pune Shivaji Nagar Bus Stand | काँग्रेसच्या आंदोलनाचा दणका ! शिवाजीनगर एसटी स्थानकाचे काम मार्गी लागले – माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Congress Mohan Joshi – Pune Shivaji Nagar Bus Stand | काँग्रेस पक्षाने आंदोलनाचा दणका दिल्यामुळे शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी आणि महामेट्रोच्या खर्चात बांधण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली आहे. (Congress Mohan Joshi – Pune Shivaji Nagar Bus Stand)

प्रवाशांची सोय आणि वाहतुकीची सुरक्षितता लक्षात घेऊन शिवाजीनगर एसटी स्थानक पूर्ववत जागी होण्यासाठी १५ दिवसांत निर्णय घेतला जावा, अशा मागणीसाठी माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर दि. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी आंदोलन करण्यात आले होते. हा प्रश्न मार्गी लागला नाही, तर मुख्य मंत्र्यांनाच पुण्यात अडवू, असा इशारा मोहन जोशी यांनी दिला होता.

महामेट्रोच्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानकाचे स्थलांतर करण्यात आले होते. महामेट्रोचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले तरी एसटी स्थानक पूर्ववत करण्याबाबत निर्णय होत नव्हता. एसटी स्थानकाचा आराखडा मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर झाला होता. परिवहन खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्याने त्यांची गाडी अडविण्याचा इशारा देण्यात आला होता. काँग्रेस पक्षाने आंदोलनानंतरही प्रश्न मार्गी लागण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे राज्य सरकारला निर्णय घेणे भाग पडले, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

एसटी प्रवाशांची सोय व्हावी तसेच एसटी स्थानकाचे स्थलांतर पुणे -मुंबई महामार्गावर
वाकडेवाडी जवळ झाल्याने तेथील वाहतुकीची समस्या बिकट झाली होती,
ती समस्याही सुटावी, अशा दुहेरी हेतूने काँग्रेसने हा प्रश्न हाती घेतला होता.
अशी माहिती माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकात दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | ओझर येथे मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद’

Sudamrao Landge Passed Away | पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे यांचे निधन

MNS Chief Raj Thackeray | राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, ”मराठी आणि हिंदुत्त्वाबद्दल फक्त तोंड वाजवायचं, नुसतं बाळासाहेबांचे विचार…”

हटकले म्हणून तरुणावर दारूच्या बाटलीने जीवघेणा हल्ला, आकुर्डी येथील घटना

CM Eknath Shinde | CM शिंदेंकडून भुजबळांच्या मागणीचे समर्थन, म्हणाले – ”तीच भूमिका सरकारचीही आहे…”

Sudamrao Landge Passed Away | पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर सुदामराव लांडगे यांचे निधन

हटकले म्हणून तरुणावर दारूच्या बाटलीने जीवघेणा हल्ला, आकुर्डी येथील घटना