Congress MP Rahul Gandhi | राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांसह उध्दव ठाकरे, अजित पवार संतप्त; भाजपला दिला इशारा

Congress MP Rahul Gandhi | congresss first reaction after the action against rahul gandhi by priyanka chopra and jayram ramesh uddhav thackeray ajit pawar and others
file photo

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी अडनाववार केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने (Surat Sessions Court) राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर (Bail Granted) केला. या निर्णयानंतर 24 तासांत त्यांची खासदारकी रद्द (Disqualified) केली आहे. लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांची खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेत्यांसह इतर नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसेच भारतातील लोकशाही धोक्यात आल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

आमचा लढा सुरु राहिल – जयराम रमेश

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री जयराम रमेश (Former Minister Jairam Ramesh) यांनी ट्विट करुन राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आमचा लढा सुरुच राहील. कायदेशीर आणि राजकीय या दोन्ही मार्गाने आम्ही लढाई लढू, आम्ही ना घाबरणार, ना गप्प बसणार, जेपीसी, मोदींशी संलग्नित असलेला अदानी महाघोटाळा, यां ऐवजी राहुल गांधींना अपात्र ठरवण्यात आलंय. भारतीय लोकशाही ओम शांती… असं म्हणत जयराम रमेश यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

भाजप भ्रष्टाचाराचं समर्थन करतंय का ? – प्रियंका गांधी

नीरव मोदी घोटाळा (Nirav Modi scam)- 14 हजार कोटी, ललित मोदी घोटाळा (Lalit Modi scam)- 425 कोटी, मेहुल चोक्सी घोटाळा (Mehul Choksi scam) -13 हजार 500 कोटी. ज्या लोकांनी देशाचा पैसा लुटला, भाजप त्यांना वाचवण्यासाठी का प्रयत्न करत आहे, तपासापासून का पळून गेले आहेत? याउलट जे लोक यांच्याबद्दल प्रश्न विचारतात त्यांच्यावरच केसेस टाकण्यात येत आहेत. भाजप भ्रष्टाचाऱ्याचं समर्थन करतेय का, असे म्हणत प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी राहुल गांधींच्या कारवाईनंतर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

षडयंत्रानंतरही हा लढा थांबणार नाही – विजय वड्डेटीवार

राहुल गांधी यांच्यावर कारवाई केल्यानंतर विजय वड्डेटीवार (Vijay Vaddetiwar) यांनी मोदी सरकारवर (Modi Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व (Lok Sabha Membership) आज मोदी सरकारच्या दबावाखाली रद्द करण्यात आली आहे. देशहितासाठी रस्त्यापासून ते संसदेपर्यंत सातत्याने लढा देत लोकशाही वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहुल गांधी करत आहेत. मोदी सरकारच्या षडयंत्रानंतरही हा लढा थांबणार नाही, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.

लोकशाहीसाठी तुरुंगात जायला तयार – मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) म्हणाले, राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्यासाठी भाजपने (BJP) सर्व प्रकारचे प्रयत्न केले. सत्य बोलणाऱ्यांना ठेवायचे नाही, असे भाजपचे राजकारण आहे. पण आम्ही सत्य बोलत राहू, आम्ही जेपीसीची मागणी करत राहू. गरज पडल्यास लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगातही जायला आम्ही तयार आहोत. आज संध्याकाळी पाच वाजता पक्ष कार्यालयात आमच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आम्ही पुढची रणनीती ठरवू अशी माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.

चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला – उद्धव ठाकरे

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. चोराला चोर म्हणणे हा गुन्हा ठरला आहे. चोर, देश लुटणारे आजही मोकळे आहेत व राहुल यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकुमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे, लढत राहू, अशी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) प्रतिक्रिया संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट केली आहे.

हा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा – अजित पवार

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही.
लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार घटनेने दिला आहे.
तरीदेखील संसदेत अशी खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेतला जो लोकशाहीला धक्का देणारा आहे,
अशा शब्दात महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

हा निर्णय लोकशाही विरोधी – नाना पटोले

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.
हा निर्णय लोकशाही विरोधी आहे. गेल्या 9 वर्षात पंतप्रधान मोदी यांच्या मित्रांनी लाखो-हजारो कोटी रुपये
देशातून पळवले आहेत. मात्र, त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द
करण्यात आले आहे. याचा आम्ही निषेध करतो आणि मोदी सरकारचा धिक्कार करतो, असे नाना पटोले
(Nana Patole) म्हणाले.

Web Title :- Congress MP Rahul Gandhi | congresss first reaction after the action against rahul gandhi by priyanka chopra and jayram ramesh uddhav thackeray ajit pawar and others

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Municipal Corporation (PMC) Budget | पुणे महापालिकेचे 2023-24 चे अंदाजपत्रक 9 हजार 515 कोटी रुपयांचे; कुठलिही करवाढ नाही, मात्र…

Top Ten MP in India | देशातील टॉप-टेन खासदारांच्या यादीत महाराष्ट्रातील 4 खासदारांचा समावेश, सुप्रिया सुळे ‘अव्वल’

Total
0
Shares
Related Posts