Post_Banner_Top

आघाडीला उमेदवारही मिळेना !

वेळप्रसंगी युतीला 100 टक्के जागा : महाजन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला उमेदवारही मिळायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा महायुतीच्या येतील. वेळप्रसंगी शंभर टक्के जागा मिळाल्या, तर आश्चर्य वाटायला नको, असा दावा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

नगरमध्ये बोलताना आज जलसंपदामंत्री महाजन म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची अवस्था दयनीय झालेली आहे. त्यांच्यात एक वाक्यता राहिलेली नाही. माझ्यावर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे. उत्तर महाराष्ट्रात एकही जागा कमी होणार नाही. देशामध्ये भाजपासह मित्रपक्षांना मोठे यश मिळणार आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. जनता भाजपबरोबर राहणार आहे, असेही ते म्हणाले.

Loading...
You might also like