राहूल गांधींच्या सभेतील गर्दीमुळे चोरट्यांचे चांगभले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – धुळ्यातील राहूल गांधी यांच्या सभेतील गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी नागरिकांच्या 10 मोबाईलसह 15-20 पाकिटांवर डल्ला मारला. याप्रकरणी देवपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमित अशोक झोपे (रा.सुयोग नगर) यांनी तक्रार दिली आहे.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात कॉग्रेस कमेटीच्या वतीने एस. एस. व्ही. एस. कॉलेज मैदानावर जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला खूप गर्दी होती. पोलीस बंदोबस्तही तगडा होता. प्रत्येक नागरीकाची सभास्थळाजवळ येण्यापुर्वी मेटल डिटेक्टर व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून कसून तपासणी करण्यात येत होती. यात पोलीसांनी नागरीकांच्या खिशातून गुटखा, तंबाखू पुड्या काढून जमा केल्या. यावेळी पोलीसांनी पत्रकार व छायाचित्रकार यांचीही झाडझडती घेतली.

बेकायदा होर्डिंगप्रकरणी ‘त्या’ महापौर, आमदारांनी घेतले अंग काढून ; कार्यकर्ता लागला कामाला

सभा आटोपताच चोरट्यांनी परत जाणाऱ्या नागरीकांचे महागडे मोबाईल व पाकिटांवर डल्ला मारत स्वतःचे चांगभले केले. यावेळी गर्दीतून काही जणांनी आरडाओरड केली. तेव्हा संशयीतरित्या पळत असलेल्या दोघांना नागरीकांनी पकडले. त्यांना चांगलाच चोप देऊन पोलीसांच्या ताब्यात दिले. अधिक तपास धुळे पोलीस करत आहेत.