कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत सुधारणा, सर गंगाराम रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. 30 जुलै रोजी सोनिया गांधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सर गंगा राम रुग्णालय व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.डी.एस. राणा यांनी रविवारी हेल्थ बुलेटिन जाहीर करताना यासंदर्भात माहिती देताना म्हंटले कि, 30 जुलै रोजी सायंकाळी 7 वाजता रुग्णालयात दाखल केलेल्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज दुपारी 1 वाजता रुग्णालयातून सोडण्यात आले. डिस्चार्जच्या वेळी त्याची प्रकृती स्थिर होती. रूटीन टेस्ट आणि चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.