Congress Rita Yadav | PM मोदींना काळा झेंडा दाखवणाऱ्या काँग्रेसच्या महिला नेत्यावर गोळीबार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Congress Rita Yadav | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना काळा झेंडा दाखवणा-या काँग्रेसच्या (Congress) एका महिला नेत्यांवर अज्ञातांनी गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रीता यादव (Congress Rita Yadav) असं त्या महिला नेत्याचं नाव आहे. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) सुलतानपूर जिल्ह्यात मोदींना काळा झेंडा दाखवला होता. दरम्यान, काही अज्ञातांनी गोळीबार केला. यादव यांच्या पायाला गोळी लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत. त्यांना जखमी अवस्थेत सीएचसी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यानंतर त्यांना हायर सेंटरला पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

रीता यादव (Congress Rita Yadav) या समाजवादी पार्टीला रामराम करुन काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यावेळी पोस्टर आणि बॅनर बनवण्याच्या कामानिमित्त सुलतानपूरमध्ये (Sultanpur) गेल्या होत्या. दरम्यान, काम संपवून सुलतानपूरमधून घरी जात असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. लंभुआ परिसरात हायवेवर 3 जणांनी त्यांच्या गाडीला ओव्हरटेक करुन समोर गाड्या आडव्या उभ्या केल्या. त्यानंतर त्या अज्ञांतांनी रीता यांच्यावर गोळीबार केला त्यावेळी त्यांच्या पायावर गोळी लागली. यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. सध्या संबंधित अज्ञाताचा शोध पोलिस (Police) घेत आहेत.

पोस्टर, बॅनर बनवण्याचे काम उरकून सुलतानपूर वरुन परत येत असताना लंभुआजवळ तिघांनी आमच्या गाडीला ओव्हरटेक केलं. बोलेरो गाडी थांबवून या तिघांनी शिवीगाळ करत गाडीतील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी चालकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेवले. त्यानंतर मी पिस्तूल लावणाऱ्याच्या कानशिलात लगावली. तेव्हा संतापलेल्या त्या व्यक्तीने माझ्या पायावर गोळी मारली आणि ते हल्लेखोर तेथून फरार झाले. असं रिता यांनी सांगितलं.

कोण आहेत रिता यादव?
16 नोव्हेंबर मध्ये पंतप्रधान मोदी पूर्वांचल एक्सप्रेसवेचं उद्घाटन करण्यासाठी सुलतानपूर जिल्ह्यामधील कूरेभारमधील अरवल कीरीमध्ये सभा घेत होते. त्यावेळी रीता यादव यांनी त्यांना काळा झेंडा दाखवला होता. पोलिसांनी रीता यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 2 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाला. एक महिन्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. असं एका वृत्तानुसार समजते.

Web Title : Congress Rita Yadav | pm protest black flag congress leader rita yadav attack shoot

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी