‘राष्ट्रवादीपासून लांब राहिलेलेच बरे’ ; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या राज्यात सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची चमक दिसून आली. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यामुळे आता विधानसभेला वंचित आघाडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाणार का यावर वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांनी मोठे वक्तव्य केले आहे. तसंच त्यांनी यावेळी काँग्रेसवर टीकाही केली.

राज्यातील काँग्रेसची स्थिती पाहूनच आम्ही त्यांना ४० जागांचा प्रस्ताव दिला आहे. आम्ही आमचा प्रस्ताव दिला आहे. पुढे काय करायचे ते काँग्रेसने ठरवावे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. सध्या केंद्रात आणि राज्यातही त्यांच्याकडे निर्णय घेणारेच कोणीच नाहीये. त्यामुळे धड आहे आणि डोकं नाही, अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. गेल्या तीन निवडणुकांपासून राज्यातील निम्म्या मतदारसंघात काँग्रेस लढलीच नाहीये. त्यामुळे तिथे त्यांचे संघटनच नाही. आमच्या प्रस्तावाचे काय करायचे, याचा निर्णय काँग्रेसने घ्यायचा आहे. आमच्या संसदीय समितीने दौरे सुरू केले आहेत. दहा जिल्ह्यात मुलाखतीही झाल्या आहेत. तसंच लोकसभेप्रमाणे आम्ही राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ लढण्याची आमची तयारी आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

काँग्रेसवर टीका करताना आंबेडकर यांनी राष्ट्रावादीवरही आपले मत व्यक्त केले. आपली मते राष्ट्रवादीला मिळतात. पण त्यांची मते आपल्याला मिळत नाही, अशी काँग्रेस नेत्यांचीच तक्रार असते. त्यामुळे राष्ट्रवादीपासून दोन हात लांब राहिलेलेच बरे, असं सुचक वक्तव्यही आंबेडकर यांनी यावेळी केले.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेससह अनेक नेत्यांनी भाजपची बी टीम असल्याची टीका केली होती. त्यावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. इतकी वर्षे मी सत्तेविनाच आहे. त्यामुळे मी सत्तेचा भूकेला नाही. हे तुम्हाला कळायला हवं, असं आंबेडकरांनी म्हटलं.

आरोग्यविषयक वृत्त

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’