
Cordelia Cruise-Covid-19 | आर्यन खान प्रकरणातील कॉर्डेलिया क्रूझवर कोरोनाचा ‘विस्फोट’ ! 66 प्रवाशांना कोरोनाची लागण, गोवा सरकारने प्रवेश नाकारला
पणजी : वृत्त संस्था – Cordelia Cruise-Covid-19 | कॉर्डेलिया क्रूझचे नष्टचर्य संपता संपत नसल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये या क्रूझने मुंबई – गोवा ट्रिप (Mumbai Goa Trip) आयोजित केली होती. तेव्हा रेव्ह पार्टीचे प्रकरण घडले. त्यात प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा पुत्र आर्यन खान (Aryan Khan) याच्यासहीत अनेकांना केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (NCB)ने अटक केल्याने ही ट्रिप रद्द करावी लागली होती. आता नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी आयोजित केलेल्या या ट्रिपमधील ६६ प्रवासी कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे या क्रूझवरील प्रवाशांना गोव्यात उतरण्यास मनाई करण्यात आली आहे. (Cordelia Cruise-Covid-19)
नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी हे क्रूझ मुंबईहून २ हजार प्रवाशांना घेऊन गोव्याकडे निघाले. नव वर्षाच्या पहिल्या दिवशी हे क्रूझ गोव्यामधील बंदरात आले. तेव्हा नियमानुसार गोवा सरकारच्या आरोग्य विभागाच्या पथकाने प्रवाशांच्या कोरोना चाचण्या केल्या होत्या. त्यांचा अहवाल आल्यावर त्यात ६६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सर्व प्रवाशांना क्रूझवरच थांबविण्यात आले आहे. गेले तीन दिवस हे क्रूझ व सर्व प्रवासी क्रूझवर थांबले आहेत. काल रात्री या प्रवाशांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. मात्र, गोवा सरकारने त्यांचा निर्णय बदलला नाही. त्यांनी कोणालाही किनार्यावर उतरण्यास मनाई केली. त्यानंतर आता आज सकाळी हे क्रूझ पुन्हा मुंबईच्या दिशेने निघाले आहे. (Cordelia Cruise-Covid-19)
Web Title : Cordelia Cruise-Covid-19 | goa 66 of 2000 people on board cordelia cruise ship test covid 19 positive
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना
LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान
फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा
लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी