‘कोरोना डायरीज’ : बनारसच्या रेड लाईट एरियातील ‘सेक्स वर्कर’नं सांगितले ‘लॉकडाऊन’मधील विचित्र किस्से !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  माझं नाव माया (बदललेलं नाव) आहे. मी बनारसला राहते. आम्ही तसे हवडा बंगालचे रहिवाशी आहोत. परंतु आमचा जन्म बनारसचा आहे. मला एक लहान बहिण होती. तिचं लग्न होऊन ती बाहेरच्य देशात गेली. आम्ही इथंच आहोत. बाब विश्वनाथाच्या कृपेनं धंदा चालतो आमचा. आता लॉकडाऊन असल्यानं बसूनच असतो आम्ही. लोक सांगत आहेत अजून लॉकडाऊन वाढणार आहे.

जशी इतरांना अडचण आहे तशी आम्हाला आहे. आम्हाला भाडं आणि जेवणाचे पैसे द्यावे लागतात. सर्व हिशोब अम्मा बघते. सर्व मुली तिच्याकडेच पैसे देतात. ती लागेल तसं सर्वांना देत असते. आम्ही बँकेत तर नाही जाऊ शकत.

अनेक लोक यायचे बंद झालेत. ग्राहकांपैकी अनेक लोक मजुर आहेत. कोणाला पैसे अॅडव्हान्स नाही मागू शकत ना. तेही त्यांच्या गावाला जात आहेत. एक पोलीसवाला आमचा ग्राहक आहे. त्याची लॉकडाऊनमध्ये ड्युटी आहे. तो आजही येतो. त्यांना मी म्हटलं की, बाबा विश्वनाथाच्या दर्शनला घेऊन चला मला. माझी खूप इच्छा आहे.

घाटावर गंगेची आरती पहायची होती. पंरतु तेही बंद आहे. आमचं काम रात्रीचं असतं. सकाळी आम्ही जेवण करून झोपी जातो. एका पोलीसवाल्याला विनंती केल्यानंतर त्यानं मला गाडीतून फिरवलं. असं बनारस कधीच पाहिलं नाही. माणूसही नाही आणि कोणतं पाखरूही नाही. परंतु त्यानं मला बाबा विश्वनाथाच्या दरवाज्यावर नेलं. बाहेरूनच हात जोडले परंतु बाबांचं दर्शन झालं. हे कधीच विसरणार नाही. त्या दिवशी पूर्ण दिवस फिरले. अम्माच्या परवानगीनंतर पोलीसवाल्यानं मला फिरवलं.

ज्याला कोणाला फोन करावा तोच हेच म्हणत आहे की, लॉकडाऊन झालं की, गावी जाणार आहे. जे रोजंदारीवर काम करतात ते तर नाही थांबणार. सर्वांचा रोजगार बंद आहे. पगार आहे त्यांन पगार मिळेलच खास करून सरकारी लोक. आम्हाला कोणताही पगार नाही. रोज कमवा आणि रोज खावा. बाबा विश्वनाथ कृपा करो सर्वांवर. लवकरच पळून जावा हा कोरोना बिरोना.