‘कोरोना’मुळे नागरिकांना व्यायामाचे महत्त्व समजले : मानखेडकर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   फीट इंडिया योजनेअंतर्गत नागरिकांना व्यायामाचे महत्त्व सांगून
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी गरजेचे आहे. कोरोनामुळे नागरिकांना व्यायामाचे महत्त्व समजले, ही जमेची बाजू आहे, असे मत भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी व्यक्त केले.

नेहरू युवा केंद्र, भारत सरकार- पुणे आणि सिद्धेश्वर महिला बहुददेशीय संस्था व लक्ष्य स्पोर्ट्स अँकडमी यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न लोहपुरुष सरदार वललभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एकता दौड आयोजित केली होती. याप्रसंगी मानवी युवा विकास संस्थेचे अध्यक्ष दिगंबर माने, कै.अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्रनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, चंद्रकांत भांगे, नितीन कापरे, डॉ. शंतनू जगदाळे,
महेंद्र बाजारे आदी उपस्थित होते. यावेळी खेळाडूंना 95 मास्क देण्यात आले.