Coronavirus : नवीन प्रकरणामध्ये महाराष्ट्राच्या बरोबरीला केरळ, ‘ही’ आहेत देशातील 5 हॉटस्पॉट राज्ये

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – देशात कोरोना रुग्णांचा आकडा 71 लाखाच्या पार पोहचला आहे. यामधील 61.49 लाख लोक बरे झाले आहे. त्याचबरोबर 8.61 लाख रुग्ण अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोनाच्या प्रकरणात घट होताना दिसत आहे. तसेच केरळमध्ये दररोज 20 नवीन प्रकरणे समोर येत आहे.

दक्षिण भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबण्याचे नाव घेत नाही. केरळमध्ये गेल्या चोवीस तासांत जवळपास साडे नऊ हजार नवीन रुग्ण आढळले आहेत, तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजारांच्या पुढे गेली आहे. कर्नाटकातही चोवीस तासांत सुमारे साडेसात हजार नवीन रुग्ण आढळले तर 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोरोना प्रकरणांमध्ये घट झालेली पहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात सुमारे 11 हजार नवीन प्रकरणे समोर आली आहे तर 309 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, पुणे शहरात कोरोना संसर्गाची गती कमी झाली आहे. 24 तासांत येथे 630 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात एकूण कोरोनाची प्रकरणे सुमारे 15 लाख 30 हजाराच्या आसपास आहेत. रिकव्हरी दर सुमारे 83 टक्के आहे.

राजधानी दिल्लीत कोरोना संसर्गाच्या दरातही किंचित घट झाली आहे. 24 तासांत राजधानीत 2780 नवीन रुग्ण आढळले असून 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकूण रुग्णांची संख्या जवळजवळ 3.10 लाखांवर आहे तर आतापर्यंत 5700 पेक्षा जास्त रुग्णांचा बळी गेला आहे. दिल्लीचा रिकव्हरीचा दर 91 टक्क्यांहून अधिक झाला आहे.

टॉप -5 राज्ये, जेथे सर्वात जास्त सक्रिय प्रकरणे
आंध्र प्रदेशात 46 हजार 295, कर्नाटकात 1 लाख 20 हजार 289, महाराष्ट्रात 2 लाख 21 हजार 637, तामिळनाडूमध्ये 44 हजार 95 आणि उत्तर प्रदेशात 40 हजाराहून अधिक कन्फर्म प्रकरणे आहेत.