Corona Vaccination in India | भारताची लसीकरण मोहिमेत चमकदार कामगिरी; अमेरिका, इंग्लंड सारख्या बलाढ्य देशांनाही टाकलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Corona Vaccination in India | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Virus) हाहाकार माजवल्यानंतर डेल्टाने (Delta) जगभराचे संकट वाढवले. त्याचे प्रमाण कमी होते ना होते तोपर्यंत ओमायक्रॉन व्हेरियंट चा (Omicron Variant) संसर्ग वाढला. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. कोरोना नियंत्रणासाठी कोरोना प्रतिबंधक लस (Corona Preventive Vaccine) हाच एकमेव पर्याय असून संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. दोन डोस घेतल्यानंतर बुस्टर डोसही (Booster Dose) देण्याचे नियोजन सुरु असून इस्त्रायलमध्ये तर त्याला सुरुवात झाली आहे. मात्र, आता लसीकरणाबाबत एक नवी माहिती समोर आली असून अमेरिका, इंग्लंडसारख्या बलाढ्य देशांना मागे टाकत भारताने लसीकरण (Corona Vaccination in India) मोहिमेत आघाडी घेतल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.

मनसुख मांडवीय म्हणाले, ‘भारतात आजपासून 15 ते 18 वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण (Vaccination) सुरू करण्यात आले आहे. जगातील सर्वात यशस्वी आणि सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्चाखाली सुरु आहे. कमी लोकसंख्या असलेल्या अनेक विकसित पाश्चात्य राष्ट्रांपेक्षा भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेची कामगिरी चांगली आहे. (Corona Vaccination in India)

काही दिवसांपूर्वीच एका प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने भारताने लसीकरणाचे लक्ष्य चुकवल्याचा दावा केला होता. तो दावाही मांडवीय यांनी फेटाळून लावत हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे म्हंटले आहे. या दाव्यातून संपूर्ण चित्र स्पष्ट होत नाही, असे केंद्र सरकारने (Central Government) यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कमी लोकसंख्या असलेल्या अनेक विकसित पाश्चात्य राष्ट्रांतील लसीकरणाची तुलना केली तर भारतातील लसीकरण मोहिम सर्वात यशस्वी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भारतात 16 जानेवारी 2021 रोजी लसीकरणाला सुरुवात झाली. त्या दिवसापासून 90 टक्के पात्र नागरिकांना पहिला डोस तर दुसरा डोसच्या 65 टक्क्यांपेक्षा जास्त डोस दिले आहेत. इतर देशांची तुलना केली तर भारताची कामगिरी चांगली आहे. 9 महिन्यांच्या कमी कालावधीत 100 कोटी डोस देणे,एकाच दिवसात 2.51 कोटी डोस देणे आणि अनेकदा दररोज 1 कोटी डोस देणे ही कामगिरीदेखील उल्लेखनीय आहे.

Web Title : Corona Vaccination in India | india pm modi leadership running most successful and largest vaccination programme world

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी