Coronavirus : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’चा कालावधी 2 आठवड्यांनी वाढवावा, ‘या’ मुख्यमंत्र्यांनी केली मोदी सरकारकडे मागणी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 एप्रिल पर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता ही मर्यादा वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे की, लॉकडाऊनची मर्यादा वाढवली जावी. जनतेचा जीव वाचवण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याची गरज आहे. घरात राहून आपण सुरक्षित राहू शकतो. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोरोनासंदर्भात परिस्थित बिकट झाली तर लॉकडाऊनची मर्य़ादा वाढविल्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे के. चंद्रशेखर यांचे म्हणणं आहे. अर्थव्यवस्थेतील हानी भरून काढली जाऊ शकते मात्र जीवित हानी झाल्यास ती भरून काढता येत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोस्टन ग्रुपच्या रिपोर्टनुसार लॉकडाऊन जूनपर्यंत वाढवण्याची गरज आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन हे एकमेव शस्त्र आहे. त्यामुळे भारत सरकारला माझी विनंती आहे की तेलंगणातील लॉकडाऊनची मर्यादा वाढवली जावी.
सध्या देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा 4000च्या वर गेला आहे. अशावेळी नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावं असं वारंवार प्रशासनाकडून सांगितलं जात आहे. याशिवाय राज्य शासनही विविध क्लृप्ल्या शोधून नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन करीत आहेत.