कोरोनावरून राजकारण तापले, Lockdown बाबत देशात मोदी विरूद्ध विरोधी पक्ष अशी स्थिती

नवी दिल्ली : कोरोनाचा कहर देशात ज्या वेगाने वाढत आहे, तेवढ्याच वेगाने राजकारण सुद्धा वाढत आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी एकीकडे ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आहेत ती राज्य लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेत आहेत. दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान आणि झारखंड सारख्या विना-भाजपा शासित राज्यांनी लॉकडाऊन लावला आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना लॉकडाऊन टाळण्याचा सल्ला दिला आहे, ज्याची भाजपा शासित राज्य अंमलबजावणी करताना दिसत आहेत. अशावेळी लॉकडाऊनबाबत मोदी विरूद्ध विरोधी पक्ष अशी स्थिती निर्माण झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित करताना राष्ट्रीय लॉकडाऊनची शक्यता फेटाळून लावत म्हटले की, सध्याच्या स्थितीमध्ये आपल्याला देशाला वाचवायचे आहे. मी राज्यांना विनंती करतो की त्यांनी लॉकडाऊनचा अंतिम पर्याय म्हणून वापर करावा. लॉकडाऊनपासून वाचण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे. मायक्रो कन्टेनमेंट झोनवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. पीएम मोदी यांनी स्पष्ट केले की, देशव्यापी लॉकडाऊन लावले जाणार नाही.

दिल्लीत एक आठवड्याचे लॉकडाऊन
पीएम मोदी यांनी राज्यांना लॉकडाऊन न लावणे आणि दुसरे पर्याय अवलंबण्याचा सल्ला तेव्हा दिला आहे, जेव्हा देशात कोरोनाने विध्वंस सुरू केल्याने अनेक राज्यांनी आपल्या येथे लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला होता. दिल्लीत कोरोना वेगाने वाढत असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आठवड्याचे लॉकडाऊन लावले आहे.

राजस्थान, झारखंड आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन
राजस्थानमध्ये कोरोना प्रकरणे वाढल्याने अशोक गहलोत यांच्या काँग्रेस सरकारने 15 दिवसांचा लॉकडाऊन लावला आहे. झारखंडमध्ये कोरोना संकट वाढल्याने हेमंत सोरन यांच्या नेतृत्वातील महाआघाडी सरकारने राज्यात 22 ते 29 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अतिशय भयंकर आहे, यास तोंड देण्यासाठी विचार सुरू आहे. येथे प्रतिबंध आणखी कडक करण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूर्ण लॉकडाऊनची लवकरच घोषणा करू शकतात.

भाजपा शासित राज्यांमध्ये कोरोनाचा कहर पण लॉकडाऊन नाही
कोरोनामुळे लोकांचे प्रचंड हाल सुरू असताना भाजपा शासित राज्य लॉकडाऊन न लावण्याच्या मुद्द्यावर आडून बसली आहेत. युपीमध्ये तर हायकोर्टाने आदेश देऊनही योगी सरकारने तो धुडकाावत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तर मध्य प्रदेश आणि हरियाणामध्ये स्थिती नियंत्रणा बाहेर गेली असतानाही एमपीचे शिवराज सिंह चौहान सरकार आणि हरियाणाच्या मनोहर लाल खट्टर यांच्या भाजपा सरकारने लॉकडाऊन लावले जणार नाही असे स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊनवर मोदी विरूद्ध विरोधी पक्ष
मोदींच्या भाषणानंतर महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांनी म्हटले की, देशात विविध न्यायालयांनी लॉकडाऊन लावण्याचे निर्देश दिले आहेत. लोकांना आशा होती की, प्रवासी मजूर, गरीब, छोटे व्यापारी यांच्यासाठी पीएम मदत पॅकेजची घोषणा करतील.

लोकांनी आपले रक्षण स्वता करावे
काँग्रेसने मोदींच्या भाषणावर टीका करताना म्हटले की, मोदींच्या भाषणातून हे ज्ञान मिळाले की, आता त्यांच्या आवाक्यात काहीही नाही आणि लोकांनी आता आपल्या जीवाचे रक्षण स्वता करावे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनीष तिवारी म्हणाले, पंतप्रधानांच्या भाषणाचा सारांश हा होता की, आता ही लोकांची जबाबदारी आहे. जर तुम्ही ही जबाबदारी पार पाडली तर पुढील एखादा उत्सव आणि महोत्सवात आवश्य भेटू. तोपर्यंत शुभेच्छा. इश्वर तुमचे रक्षण करो.