Coronavirus : अंतिम टप्प्यात पोहचली चीनची ‘ही’ वॅक्सीन, PAK देखील होणार सप्लाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या सिनोफार्म कंपनीने दावा केला आहे की, त्यांच्या लसीच्या ‘रोगप्रतिकारक प्रतिक्रियेच्या चाचणी’चा चांगला परिणाम आला आहे. यासह लस तिसऱ्या टप्प्यातही दाखल झाली आहे. जगभरातील तज्ञांचे म्हणणे आहे की, या वर्षाच्या सुरूवातीस कोरोना लस विकसित होऊ शकते. लस शर्यतीत ब्रिटन, अमेरिका आणि चीन आघाडीवर दिसत आहेत.

सिनोफार्मच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, पहिल्या आणि मध्यम टप्प्यातील चाचण्यांमध्ये, त्यांची सुरक्षा आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवून प्रतिपिंडे तयार करण्याचे पुरावे सापडले आहेत. अहवालानुसार, नियामक मंजुरीसाठी आता याची चाचणी ऍडव्हान्स लेव्हलवर केली जाईल.

सिनोफार्मच्या अध्यक्षांनी गेल्या महिन्यातच माध्यमांना सांगितले होते की, या वर्षाच्या अखेरीस एक चांगली लस तयार होईल. या लसीची तिसर्‍या टप्प्यातील चाचणी केवळ तीन महिन्यांत पूर्ण केली जाईल. संपूर्ण जगात कोरोनामुळे आतापर्यंत ७ लाख ७३ हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

सिनोफार्मचे संशोधक आणि चीनमधील ‘डिसीज कंट्रोल अ‍ॅथॉरिटीज’चा हा अहवाल ‘जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन’ (जेएएमए) मध्ये प्रकाशित झाला आहे. अहवालात संशोधकांनी म्हटले आहे की, या लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात ३२० निरोगी लोकांचा समावेश होता. यातील कोणत्याही व्हॉलिंटियरवर या लसीचा दुष्परिणाम झालेला नाही.

चीनमधील राष्ट्रीय औषध समूह सिनोफार्म युएईमध्ये या लसीची चाचणी घेत आहे, कारण सतत कमी होत असलेल्या प्रकरणांमुळे चीनकडे काही मोजक्या टेस्टिंग जागा बाकी आहेत. चीनमध्ये आतापर्यंत फक्त ८४ हजाराहून अधिक प्रकरणे आहेत आणि worldometers च्या यादीत ते ३३ व्या स्थानी आहेत.

कंपनीचे म्हणणे आहे की, चाचण्यांच्या पुढील टप्प्यात या लसीची १५,००० लोकांवर चाचणी घेता येईल. चाचणी करारानुसार, या लसीच्या उमेदवाराचे डोस पाकिस्तानमध्येही पुरवले जातील. चीन कोरोना विषाणूच्या ८ लसींच्या क्लिनिकल चाचणीच्या वेगवेगळ्या टप्प्यांची चाचणी करत आहे.

अमेरिकेने यापूर्वी ही खात्री करुन घेतली आहे की, लस तयार झाल्यानंतर ती प्रत्येक नागरिकाला मोफत दिली जाईल. मात्र आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी पॉल मँगो म्हणाले की, त्याच्या नियामक मूल्यमापन व मंजुरी प्रक्रियेत कोणतीही शिथिलता राहणार नाही.