वर्दीसह आईचीही जबाबदारी पार पाडते ‘कोरोना’ वॉरियर, 11 महिन्यांच्या बाळाला घेऊन करतेय कर्तव्याचं ‘पालन’

बिहार : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गाचा प्रसार वाढत असून देशातील एकूण रुग्णांची २३ हजार ७७ झाली आहे. याला रोखण्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीस देखील दिवस- रात्र एक करून काम करत आहे. यामध्ये महिला पोलीस, डॉक्टर स्वतःची मुलं, घर, संसार सोडून केवळ आपल्या ड्युटीवर लक्ष देत आहे. याच पार्श्वभूमीवर बिहारमधील एका महिला पोलिसाची बातमी समोर आलीय. ही महिला पोलीस कोरोना संसर्गाच्या संकट काळात ड्युटीसह आईचंही कर्तव्य बजावत आहे.

बिहारमधील सासाराम येथील मुख्य चौकात ड्युटी करणारी पूजा कुमारी बिहार पोलिसात कर्तव्य बजावत आहे. ही महिला पोलीस दिवसभर भूक, तहान विसरून भर उन्हात ड्युटी करते. दरम्यान, ११ महिन्यांपूर्वी पूजाने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळ लहान असून त्याला घरी ठेवता येत नसल्याने ती या ११ महिन्याच्या बाळाला कडेवर घेऊन पूजा ड्युटी करत आहे. यावरती पूजा म्हणते, बाळाला कडेवर घेऊन ड्युटी करताना थोडा त्रास होतो. पण, आईची माया बाळासाठी अशी अनेक संकट डोक्यावर घेऊ शकते.

याबाबत बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडेय यांना माहिती मिळताच त्यांनी पूजा कुमारीच कौतुक केलं आणि बाळाला घेऊन ड्युटी करू नको असं सांगितलं. परंतु, बाळाचा सांभाळ करायला घरामध्ये कोणी नसल्याने त्याला सोबत घेऊन ड्युटी करावी लागत असल्याचे पूजाने सांगितले. पूजासारख्या कित्येक महिला आज प्रतिकूल परिस्थितीमध्ये राष्ट्रहितासाठी घराबाहेर राहून ड्युटी करतं आहे.