कल्याणच्या 6 महिन्याच्या चिमुरड्याने जिंकला कोरोनाचा ‘लढा’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला असून चिमुरड्यापासून ते जेष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशाचत कल्याणमधील एका सहा महिन्याच्या चिमुरड्याने कोरोनाचा लढा जिंकला आहे. त्याला घरी घेउन गेल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी जल्लोषात स्वागत केले आहे. कल्याण पश्चिममधील एका 6 महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली होती. आता बाळ बरे होऊन घरी आले आहे.

मागील काही दिवसांपुर्वी कल्याणमधील एका बाळाला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखाल करणयात आले. उपचारानंतर काल चिमुरड्याला घरी सोडण्यात आले त्यानंतर सोसायटीतील नागरिकांनी टाळ्या,थाळ्या आणि शिट्या वाजवत बाळाचे स्वागत केले. बाळाच्या आईन त्याचे हात वरती करत सर्वाचे आभार मानले. यावेळी नागरिकांनी पोलिस, डॉक्टर आणि रुग्णावाहिका चालक यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या. बाळाची काळजी घेतली जाईल आणि तपासणीसाठी डॉक्टर सुद्धा वेळोवेळी पाठवले जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.