Coronavirus : जगभरात 1,00,000 लोकांना ‘कोरोना’चा संसर्ग, मृत्यूचा आकडा 3400 वर

बिजींग : वृत्तसंस्था – कोरोनामुळे चीनमध्ये आणखी ३० जणांचा मृत्यू झाला असून आता मृतांची संख्या ३०४२ वर पोहचली आहे. संसर्ग बाधित रुग्णांची संख्या ८०,५५२ वर गेली आहे. चीनमध्ये अजून नव्याने १४३ रुग्ण आढळले असून जगभरात आतापर्यंत १ लाख लोकांना संसर्ग झाला आहे, तर ३४०० लोकांचा मृत्यू झाला.

चीनमध्ये ८०,५५२ कोरोनो बाधित रुग्ण आहेत तर २३,७८४ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत ५३,७२६ लोकांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या नुसार, गुरुवारी विदेशातून आलेल्या १६ लोकांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले यातील ११ लोक गांसू प्रांतातील व ४ जण बीजिंग आणि १ व्यक्ती शांघाय मधील आहे.

अमेरिकेने केले विधेयक मंजूर

अमेरिकेत उत्तर आणि पश्चिम भागात कोरोनोचा वाढत प्रभाव आणि बळींचा आकडा १२ वर पोहचल्याने अमेरिकी संसदेने या रोगाशी लढण्यासाठी ८.३ अब्ज डॉलरचे आपत्कालीन विधेयक मंजूर केले आहे. हे विधेयक अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे स्वाक्षरीसाठी गेल्याचे सांगितले जाते. अमेरिकेत कोरोनाचा पहिला रुग्ण जानेवारीत समोर आला तर कोरोनो मुळे पहिला मृत्यू फेब्रुवारी मध्ये झाला. अमेरिकेच्या १५ प्रांतांत हा विषाणू पसरला आहे, तर १८० पेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोनाला अनेक देश गंभीर घेत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने म्हणले आहे. अमेरिका आणि युरोप भागात या रोगाचा प्रकोप वाढल्याने जागतिक बाजारपेठेत परिणामांची चिंताही वाढत आहे. इटली, फ्रान्स, इराणमध्ये संसर्ग वाढत आहे. तसेच जगातील ३० कोटी विद्यार्थ्यांना आपल्या घरी पाठवण्यात आले आहे.

सेनेगल मध्ये आढळले चार रुग्ण

सेनेगलमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कर्मचाऱ्याला संसर्ग झाला असून आणखी दोन रुग्ण समोर आले आहे. तर ब्रिटनमधील ३३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

इराणी नागरिकांना पाठवणार परत

इराणमध्ये अडकलेल्या ३०० भारतीयांची नमुने तपासणीसाठी विमानाने आणणार असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. यातील बहुतांश नागरिकांना संसर्ग झाल्याची शक्यता आहे. ज्या विमानाने भारतीय नागरिकांचे नमुने आणण्यात येणार आहे त्याच विमानाने भारतात असलेल्या दोन हजार इराणी नागरिकांतून काही परत जाणार आहे. असं केंद्रीय नागरी उड्डाण सचिव पी.एस.खरौला यांनी सांगितले.

व्हॅटिकनसिटी मध्ये कोरोनोचा पहिला रुग्ण आढळून आला असून, इराणचे विदेशमंत्री मोहम्मद जावेद यांचे सल्लागार हुसैन यांचा कोरोनोमुळे मृत्यू झाला आहे. इराणमध्ये ३५१५ जण बाधित असून १०७ जणांचा मृत्यू झाला आहे.