US मध्ये ‘कोरोना’चे थैमान, ट्रम्प म्हणाले – ‘पुढील 2 आठवडे अवघड, मृतांच्या संख्येत होणार वाढ’

नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे मरणारयांची संख्या सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत जगात 64 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. त्याचवेळी अमेरिकेत कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढून 3 लाखांवर गेली आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, पुढील दोन आठवडे फारच अवघड आहेत, आता अधिक लोक मरतील.

अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे 8400 पेक्षा जास्त लोकांनी प्राण गमावले आहेत. त्याच वेळी, यूएसमध्ये कोरोना संक्रमणाच्या 311,544 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. तर बरे झालेल्यांची संख्या 14,786 एवढी आहेत.

अमेरिकेत एका दिवसात सर्वाधिक मृत्यू :

जगातील सर्वात सामर्थ्यवान देश असलेल्या अमेरिकेत शुक्रवारी कोरोना विषाणूमुळे 1,480 लोकांचा मृत्यू झाला. एका दिवसात या विषाणूमुळे कोणत्याही देशातील मृत्यूची संख्या ही सर्वात मोठी आहे. याआधी एक दिवस, अमेरिकेत 1,169 लोकांचा मृत्यू झाला.

दरम्यान, जगात कोरोना विषाणूमुळे खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा धोका आहे. जगातील 1.2 लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 64 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, सुमारे अडीच दशलक्ष लोक बरे झाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like