Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2639 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 90 हजार 839 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 35 हजार 433 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 41 हजार 86 आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 508 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.59 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 67.07 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार 523 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 76 हजार 426 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 683 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 414 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 72.43 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 5 हजार 378 रुग्ण असून 2 हजार 493 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 714 आहे. कोरोनाबाधित एकूण 171 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील 10 हजार 250 कोरोना बाधीत रुग्ण असून 6 हजार 486 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 218 आहे. कोरोना बाधित एकूण 546 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 4 हजार 293 रुग्ण असून 1 हजार 313 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 853 आहे. कोरोना बाधित एकूण 127 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यातील 9 हजार 989 कोरोना बाधीत रुग्ण असून 4 हजार 121 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5 हजार 618 आहे. कोरोना बाधित एकूण 250 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 139 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 639, सातारा जिल्ह्यात 199, सोलापूर जिल्ह्यात 84, सांगली जिल्ह्यात 208 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1009 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 90 हजार 95 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 35 हजार 433 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. ( टिप :- दि. 8 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )