Coronavirus : पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 2955 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्याची आकडेवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे विभागातील 84 हजार 602 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 27 हजार 820 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 39 हजार 885 आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 333 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.61 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 66.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील 1 लाख 264 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 70 हजार 904 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 27 हजार 70 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 70.71 टक्के आहे.

सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत 4 हजार 976 रुग्ण असून 2 हजार 426 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 391 आहे. कोरोनाबाधित एकूण 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील 9 हजार 875 कोरोना बाधीत रुग्ण असून 6 हजार 323 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 16 आहे. कोरोना बाधित एकूण 536 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत 3 हजार 905 रुग्ण असून 1 हजार 181 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 611 आहे. कोरोना बाधित एकूण 113 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील 8 हजार 800 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 768 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 797 आहे. कोरोना बाधित एकूण 235 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3 हजार 853 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 2 हजार 955, सातारा जिल्ह्यात 229, सोलापूर जिल्ह्यात 53, सांगली जिल्ह्यात 236 तर कोल्हापूर जिल्ह्यात 380 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 55 हजार 967 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 27 हजार 820 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 6 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )