सावधान ! आता ‘नख’ खाण्याची सवय पडू शकते महागात, होऊ शकतो ‘कोरोना’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना माहमारीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मात्र, नकळतपणे केलेल्या चुकांमुळे कोरोना होण्याचा धोका अधिक आहे. काही जणांना नख वाढवायला आवडतं. पण खरंतर लहानपणापासूनच सगळ्यांना नखं वाढली की ती लगेच कापून टाकावीत असे शिकवले जाते. कारण नखं जास्त वाढल्यास ते विषारी ठरू शकतात. वेगवेगळ्या प्रकारचे किटाणू आणि घाण नखांमध्ये साचल्याने आजारी पडण्याचा धोका असतो.

काहींना नखं वाढवायला आवडतं. पण त्याच्या स्वच्छतेच्या बाबतीत नष्काळजी पणा केल्यास चांगलच महागात पडू शकतं. तुम्ही वाढवलेल्या नखात जमा झालेल्या घाणीमुळे तुम्हाला करोना संक्रमणाचा सामना करावा लागू शकतो. कोरोनाविरोधात अद्याप कोणतीही लस किंवा औषध तयार करण्यात आलेलं नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवूनच आपल्याला रोगाशी लाढायचं आहे.

डॉक्टरांकडून लोकांना नखं वेळोवेळी कापण्याचे आवाहन केले जात आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जास्त लांब नखं असतील तर इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. नखांमध्ये अडकलेली घाण नकळतपणे रोगांना निमंत्रण देऊ शकते. म्हणून नखांची स्वच्छता ठेवायला हवी. वाढलीली नखं वेळच्या वेळी काढली पाहिजेत. आजारी पडू शकता.

लहान मुलांनाही तोंडात बोट घालून नखं चावायची सवय असते. जर तुमच्या घरात लहान मुल असेल तर या बारिकसारिक गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे. कोरोच्या लसीवर जगभरातील अनेक देश संशोधन करत आहेत. मात्र, अद्याप लस उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे लस येईपर्यंत नखं वाढवण्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करू नका. त्यामुळे संक्रमणाचा धोका उद्भवू शकतो. अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, नखांद्वारे घाण पोटात गेल्यामुळे लहान मुलांना उलटी जुलाब अशा समस्या उद्भवतात. म्हणून प्रत्येकाने आपले आरोग्य आपण जपणे गरजेचे आहे.