जगासाठी चीनमध्ये ‘हजर’ आहे ‘टाईम बॉम्ब’, वैज्ञानिकांनी सांगितलं होतं

नवी दिल्ली : अनेकदा असे होते की, सुरक्षेबाबत इशारा दिला जातो, पण त्याकडे फार गांभिर्याने पाहिले जात नाही. घटना घडल्यानंतर मात्र सर्वांची नजर त्यावर पडते. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, कोरोना व्हायरसबाबत सुद्धा असेच झाले होते.

द अटलांटिकमध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार, क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी रिव्ह्यजमध्ये ऑक्टोबर 2007 मध्येच शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसबाबत इशारा दिला होता. शास्त्रज्ञांनी या दरम्यान जगाला सावध करत म्हटले होते की, चीनमध्ये एक ’टाइम बॉम्ब’ आहे.

क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी रिव्ह्यजमध्ये आजपासून 13 वर्षांपूर्वी छापले होते की, – ’एक खास प्रकारच्या वटवाघळात सार्स-कोव्ह सारखे व्हायरस खुप जास्त प्रमाणात आहेत. दक्षिण चीनमध्ये हे प्राणी खाण्याची संस्कृती आहे. यामुळे हा एक टाइम बॉम्ब आहे.’

शास्त्रज्ञांनी सार्स-कोव्ह सारख्या व्हायरसला टाइम बॉम्ब म्हटले होते. सार्स-कोव्ह व्हायरसने विध्वंस घडवल्यानंतर 5 वर्षांनी हा रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता. 2002 मध्ये समोर आलेल्या सार्स वायरसमुळे सुद्धा महामारी पसरली होती. महामारी दरम्यान सुमारे 800 लोकांचा जगभरात मृत्यू झाला होता.

सध्या जगात जी कोरोना महामारी पसरली आहे ती सार्स-कोव्ह-2 व्हायरसमुळे पसरली आहे. 2008 मध्ये क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी रिव्ह्यूजमध्ये छापलेला रिपोर्ट हा एकमात्र इशारा नव्हता. नंतर सुद्धा अनेक शास्त्रज्ञांनी कोरोनाबाबत जगाला सावध करण्याचा प्रयत्न केला होता.

अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे वायरोलॉजिस्ट मायकल बुचमीर 1980 पासूनच कोरोना व्हायरस फॅमिलीवर संशोधन करत आहेत. त्यांनी म्हटले की, धोकादायक कोरोना व्हायरस पसरण्याची अनेक वर्षांपासून शंका व्यक्त केली जात आहे. परंतु, रिसर्चसाठी निधीची कमतरता होती आणि एक्सपर्ट हे समजावण्यासाठी संघर्ष करत होते की, खुप मोठ्या लोकसंख्येला धोका निर्माण होऊ शकतो.

अमेरिकेच्या एरिजोना स्टेट युनिव्हर्सिटीच्या वायरोलॉजिस्ट ब्रेंडा होग यांनी आपले आयुष्य कोरोना व्हायरसवर रिसर्चसाठी समर्पित केले. ब्रेंडा यांनी म्हटले की, 2002 मध्ये सार्स पसरल्यानंतर त्या आणि त्यांच्या सहकार्‍याने कोरोनाशी संबंधीत वॅक्सीन तयार करण्यावर काम सुरू केले. परंतु, 2008 मध्ये फंडिंग कमी झाल्याने हे काम थांबवावे लागले.