Coronavirus : केरळमध्ये काही परिसरात ‘कम्युनिटी स्प्रेड’, सरकारनं दिले Total Lockdown चे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळच्या तिरुअनंतपुरमच्या दोन किनारपट्टी गावात सामुदायिक पातळीवर कोरोना व्हायरसचा प्रसार पाहता जिल्हा प्रशासनाने शनिवारी तिरुअनंतपुरम किनारपट्टी भागात दहा दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याचे घोषित केले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी शुक्रवारी सांगितले की, पूनथुरा आणि पुल्लुविलामध्ये समुदाय पातळीवर विषाणूचा संसर्ग झाला आहे आणि आजूबाजूच्या भागात संक्रमितांच्या संपर्कांत आल्याने संक्रमितांच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्हाधिकारी डॉ. नवजोत खोसा म्हणाले की, उत्तरेकडील एडवापासून दक्षिणेस पोझियूरपर्यंत जिल्ह्यातील किनारपट्टीचा भाग ‘क्रिटिकल कंटेनमेंट झोन’ (सीसीझेड) म्हणून घोषित करण्यात आला आहे आणि या भागात शनिवारी मध्यरात्रीपासून 28 जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाउन लागू असेल.

सध्या लागू केलेल्या निर्बंधामध्ये जी सूट देण्यात आली होती, ती दहा दिवसांसाठी दिली जाणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्या कोविड – 19 चे 1,515 पेक्षा जास्त रुग्णांवर जिल्ह्यातील विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ते म्हणाले की, सीसीझेडच्या बाहेर आणि आत हालचालींवर पूर्ण बंदी असेल आणि लोकांना त्यांच्या समस्या सांगण्यासाठी टोल फ्री क्रमांक दिला जाईल. देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 34,884 नवीन प्रकरणे, 671 मृत्यू गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या 34,884 नवीन घटनांनंतर संक्रमित लोकांची संख्या 10,38,716 वर गेली आहे. आतापर्यंत देशातील 6,53,750 लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. शनिवारी सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अद्ययावत आकडेवारीनुसार संक्रमणामुळे एका दिवसात 671 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 26,273 वर पोहोचली आहे.

सध्या देशात 3,58,692 लोकांवर उपचार सुरू आहेत. अधिकारी म्हणाले कि, “आतापर्यंत 62.94 टक्के रुग्ण निरोगी झाले आहेत.” संसर्ग झालेल्या एकूण लोकांमध्ये परदेशी लोकांचा देखील समावेश आहे. हा सलग तिसरा दिवस आहे जेव्हा देशात कोविड -19 संसर्गाचे 30,000 पेक्षा जास्त संसर्गाची नोंद झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) च्या म्हणण्यानुसार, 17 जुलैपर्यंत देशात एकूण 1,34,33,742 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. शुक्रवारी, 3,61,024 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. गेल्या 24 तासांत 671 लोक मरण पावले आहेत, त्यापैकी महाराष्ट्रातील 258, कर्नाटकात 115, तामिळनाडूमध्ये 79, आंध्र प्रदेशात 42 , उत्तर प्रदेशात 38, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये 26-26, गुजरातमधील 17, जम्मू- काश्मीर आणि पंजाबमधील नऊ-नऊ, राजस्थान आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी आठ, तेलंगणात सात, हरियाणामध्ये पाच, झारखंड, बिहार आणि ओडिशामध्ये प्रत्येकी चार, आसाम आणि पुडुचेरीमध्ये प्रत्येकी तीन, छत्तीसगड आणि गोवामध्ये प्रत्येकी दोन आणि केरळ आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी एक व्यक्तीचा समावेश आहे.