Coronavirus : ‘माऊथवॉश’मुळं कोरोना निष्क्रिय होऊ शकतो, अमेरिकेतील संशोधनातून दावा

पोलीसनामा ऑनलाईन – जगभरात कोरोनाने थैमान घातले असून जगात कोरोना बाधितांचा आकडा 4 कोटीच्या पुढे गेला आहे. तर मृतांची संख्या सव्वा अकरा लाखांच्या जवळ गेली आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, मास्क वापरा, साबनाने वारंववार हात धुवा असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यावरही भर द्या, असे सांगितल जात आहे. त्यातच आात माऊथवॉशमुळे (mouthwash) कोरोना (coronavirus) निष्क्रिय होत असल्याचे अमेरिकेत केलेल्या संशोधनातून समोर आले आहे.

माऊथवॉशमुळे कोरोना रोखता येऊ शकत असल्याची माहिती मेडिकल वायरॉलॉजीशी संबधित मासिकात प्रसिध्द करण्यात आली आहे. माऊथवॉशमधील काही घटक कोरोना विषाणुच प्रमाण कमी करण्यास उपयोग ठरत असल्याचे संशोधनातून निष्पन्न झाले आहे. कोरोना विषाणुला निष्क्रिय करण्याची क्षमता तपासण्यासाठी अमेरिकेतल्या पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिननच्या संशोधकांनी माऊथवॉश आणि नेजोफेरिंजल रिंजची तपासणी केली आहे. अनेक माऊथवॉशमध्ये कोरोना विषाणुला निष्क्रिय करण्याची क्षमता असल्याचे पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिननच्या संशोधकांच्या अभ्यासातून समोर आले आहे. कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीन माऊथवॉशचा वापर केल्यास त्याच्या माध्यमातून होणारा कोरोनाचा प्रसार कमी होऊ शकतो, असे देखील संशोधनातून (covid-19-says-study) पुढे आले आहे. जोपर्यंत आपल्याला कोरानावरील लस मिळत नाही. तोपर्यंत आपण कोरोनाचा प्रसार रोखण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हव असे पेन स्टेट कॉलेज ऑफ मेडिसिनचे प्रोफेसर क्रेग मेयर्स यांनी म्हटल आहे.

हिवाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीतीः संशोधन
कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाबद्दल दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. वायु प्रदुषण आणि धुक्क्यामुुळे कोरोना वाढत असल्याचे नुकत्याच एका संशोधनातून समोर आले आहे. हिवाळ्यात कोरोनाचा धोका वाढेल. वायु प्रदुषण आणि धुक्क्यामुुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होईल, असे संशोधन सांगत आहे. त्यामुळे दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे.